Dictionaries | References

चढणें

   
Script: Devanagari

चढणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Without once dismounting; at one stretch or run; without stopping or pausing.

चढणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To ascend, mount, climb. To increase, augment, rise,swell. To rise into the head; to affect with giddiness. To become big; to be puffed up with pride. To paint, oil &c. Ex. ह्या भिंतीवर शेंदरी रंग चढला. To acquire fullness, clearness, depth, brightness.

चढणें     

अ.क्रि.  १ वर जाणें ; ऊर्ध्व गमन करणें . आरूढणें ; वर बसणें ( डोंगर , टेंकडी , घोडा , झाड इ० च्या ). २ उंच जाणें , होणें ; वाढणें ; खूप उंच असणें ( इमारत , तारा ). ३ वृध्दि पावणें ; वाढणें ; जास्त होणें ; अधिक होणें ; फुगणे ; मोठा आकार होणें ; विस्तृत होणें . ( समुद्र , संपत्ति , ज्वर ). त्या विहिरीस पाणी चढलें कालच्या उपासानें आज पित्त चढलें . ४ महाग होणें ( किंमत , धारण ). सोन्याचा भाव चढला आहे . ५ कडक होणें ; जलाल होणें ; तीव्र होणें ( भांग ). भांग जसजशी छिनावी तसतशी चढती . ६ अम्मल चढणें ; मद चढणें ; निशा येणे ; उन्माद चढून गिरकी येणें ; कैफ येणें ( विष , मादक औषधि द्रव्य , विखार , उवाखा इ० नीं ). मला घोटा कधीं चढत नाहीं . ७ शिरणें ; जाणें ; शरीर त्यांत जाणें ( चोळी , आंगरखा इ० अंगांत ). ( बंदुकींत बाग नटें , संगीन ). आंगरखा चांगला चढतो पण जोडा चढत नाहीं . आंत जाणें ( खुंटी , खिळा , खीळ ). ही खुंटी छिद्रांत चडत नाहीं अंमळ तास . ८ सांचणें ; तुंबणें ; थकणें ; चढत राहणें ; हळूहळू वाढत जाणें ( ऋण , शंका , प्रश्न , इ० ). माझे वीस दिवस चढले त्यांचा पैसा द्या . माझे पांचशें रुपये त्याजवर चढले . ९ गर्वानें ताठणें , फुगणें ; उन्मत्त होणें . एकदां कोठें लढाईत यश आलें तर ते गृहस्थ अलीकडे चढले आहेत . १० आच्छादणें ; आवरण होणें ; वर पसरणें ; आक्रमणें ( धूळ , काजळ , जंग , वुरसा , शेवाळ ). ११ ( देवादिकांना ) वाहिलें जाणें ; अर्पण केलें जाणें . झेंडूचीं फुलें देवास चढत नाहींत . १२ सूर मोठा होणें , वाढणें , उंच होणें ( गाताना आवाज , वाद्य इ० ). १३ फिरणें ; वर जाणें ; उलटणें ( अम्मल चढला असतां , अथवा प्राणोत्क्रमण समयीं डोळे ). १४ बसणें ; लागणें ; लावला जाणें ( गिलावा , रंग , लेप , तेल , हात ). ह्या भिंतीवर शेंदरी रंग चडला म्हणजे चांगली दिसेल . १५ खुलणें ; चकचकीत दिसणें ; पूर्णत्वास पोंचणें ( रंग किंवा रंगविलेला पदार्थ , वस्तु ). हिंगुळामध्यें निंबूचा रस पिळला म्हणजे रंग चांगला चढतो . १६ ताणला जाणें ( पखवाज , मृदंग ). १७ ( धनुष्यास ) गुण लावणें ; सज्ज करणें . १८ प्राप्त होणें ; येणें ; लाभणें . जेणें करितां महिमा चडे । विरक्तांसी । - दा २ . ९ . २ . [ सं . उच्चलन - प्रा . उच्चडन ; चडढन ; सिं . चडहणु ] म्ह० चढेल तो पडेल पोहेल तो बुडेल . चढे , चढया , चढत्या घोडयानिशीं - क्रिवि . ( घोडयावर बसला असतांनाच , एक वेळहि खालीं न उतरतां ) एका तडाख्यानें ; एका दौडींत ; न थांबतां ; मोठया आवेशानें . ज शत्रु जो आला तो लागलाच चढे घोडयानिशीं किल्ल्यावर गेला . नादिरशहा याची फौज चढत्या घोडयानिशीं दिल्लीस पोहोंचली . - भाब २३ .

चढणें     

चढणारी कमान
उत्तरोत्तर वाढत जाणारी गोष्‍ट
प्रगतिपर स्‍थिति
वाढती महत्त्वकांक्षा. ‘पेशवाईच्या अस्‍ताला त्‍या वेळच्या मुत्‍सद्यांच्या महत्त्वकांक्षेची चढणारी कमान नडली.’-अस्‍तंभा ७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP