|
स्त्री. ( शब्दशः व ल . ) मागें घेणें ; उलट मारणें ; कचरणें . उतरती कळा लागणें ; मागें पडणें ( काम , नशीब इ० ). ( क्रि० घेणें ). मागें हटणें , फिरणें ; ( क्रि०घेणें ). परत येणें . उलटणें ; परतणें ( ताप इ० ). ज्वरानें माघार घेतली . [ सं . मार्ग = रस्ता ; मागें ] माघारणें - अक्रि . मागें घेणें ; फिरणें ( शब्दशः व ल . ). शड्कोनि देवऋषिवचनातें । माघारले सुर सकळ । - मुआदि ४ . १७९ . उतरती कळा ; र्हास पावणें . मागें हटणें ; मुरडणें . परतणें ; उलटणें . इ० मूळपदावर येणें ( माघार घेणें या शब्दापेक्षां ******** हा शब्द कमी प्रचारांत आहे ). - सक्रि . ( काव्य ) मागें ******** मागें टाकणें ; अतिक्रम करणें ; मागें पाडणें . माघारोनि मनपवनातें । सत्रसदना पातला । - मुआदि ११ . ५७ . [ माघार ] माघारपण - न . नुकतेंच लग्न झालेल्या मुलीनें सासरहून माहेरीं कांहीं दिवस रहावयास परत येणें ; माहेरपण . तिचें माहेराहून सासरीं परत येणें ; ( क्रि० करणें ). [ माघारा + पण ] माघारा , माघारां , माघारीं , माघारें , माघारिआ - क्रिवि . परत ; पुन्हां परत ; उलट . माघारा काढणें - मागें घेणें . माघारा भीम काढला तूर्ण । - मोस्त्री २ . ३४ . माघारी - वि . ( कों . ) नुकतेंच लग्न झालेल्या मुलाच्या अथवा मुलीच्या बरोबर माहेरीं किंवा श्वशुरगृहीं जाणारें ( मनुष्य ). सासरच्या मुलीला माहेरीं आणण्याकरितां गेलेला , पाठविलेला ( मनुष्य ). [ माघारा ] माघारीण - स्त्री . ( कों . ) सासर्याहून माहेरीं किंवा माहेराहून सासरीं कांहीं दिवस रहावयास जाणारी , नुकतेंच लग्न झालेली मुलगी . ( सामा . ) तरुण पत्नी ; मालकीण ; गृहिणी . [ माघारा ]
|