Dictionaries | References

उलथणें

   
Script: Devanagari

उलथणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in pounding in a mortar.
. 4 To turn over or about; to rummage.
To turn over or upon the other side or end. 2 To turn upon; to turn and come against or unto. 3 fig. To drop down dead.

उलथणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v c   Turn over.
v i   Drop down dead.
  A sort of ladle.

उलथणें     

 न. 
स.क्रि.  
क्रि.  फाटणें ; दुभंग होणें . तो शोक सांगतां उलथे धरणी । - रावि २४ . ४० . [ सं . उद + तल ]
अ.क्रि.  मरणें ; नाहीसें होणें ; काळें करणेम ; उलथून जाणें पहा . ' कां छळतोस मेल्या ? उलथत कीं नहीं एकदां ' - श्रुति ९८ .
उलटें करणें ; उताणें करणें ; खालची बाजू वर करणें . उलटणें . आकाश पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी ॥ - एभा १७ . १४२ .
सराटा ; कलथा ; भाकरी वगैरे परतविण्यासाठीं , आटवण्याचें दूध ढवळण्यासाठीं , केलेला पितळ किंवा लोंखडाचा पसरट तोंडाचा दांडा ; उलथा . ( व . ) उलथन .
( चांभारी धंदा ) जोड्याचीं ढोंपरें व्यवस्थित करण्यासाठीं उपयोगांत आणावयाचें लांकूड . उलथा पहा . [ सं . उत + तल ; प्रा . उत्थल्ल ]
आंतील बाजू बाहेर करणें ; फिरविणें ( अंगरखा , पागोटें इ० ).
पुरी व्यवस्था लावणें ; उरकणें ; पुरें करणें ; पार पाडणें ; तडीस नेणें ( एखादें भानगडीचें काम किंवा प्रश्न ).
उलथेंपालथें करणें ; चाळविणें ; खालींवर करणें ; हुडकणें ( एखाद्या राशींतून वगैरे ); धुंडाळणें .
उत्पन्न होणें ; प्रादुर्भुत होणें . परमतृप्ती उलथल्या पोटीं । अमृतही न लावी ओंठीं । - एभा १२ . ५९१ .
पुन्हां करणें ; परत करणें . तेंचि उलथोनि ज्ञान कथा । उद्धवासि होय सांगता । - एभा ११ . २५५ .
खालवर करणें ( उखळांतील धान्य ). - अक्रि .
उलटें होणें ; दुसरी बाजू वर येणें .
परतणें ; पुन्हां येणें .
( ल . ) आकस्मिक मृत्यु येणें ; तटकर मरणें ; मरुन पडणें ( सामा . शिवी देतांना वापरतात ). एवढा बाप्या पण पटकीनें हां हां म्हणतां उलथला . उलथत नाहीं मेला एकदांचा !
उठणें ; लोटणें . घननीळूं सांवळा । परब्रह्माचा पूतळा । पाहावेया गाओ आला । उलथौनियां ॥ - शिशु ५३४ . [ सं . उद + तल ; प्रा . उत्थल ; म . उथळ वर्णव्यत्यास ]
०जाणें   क्रि . मरणें . त्याचे म्हातारडे आईबाप तिकडे उलथून गेले . - नामना ११४ .

उलथणें     

उलथून जाणें
मरणें
नाश पावणें. ‘त्याचे म्हातारडे आईबाप तिकडे उलथून गेले.’ -नामना ११४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP