Dictionaries | References

असत

   
Script: Devanagari

असत

  न. असत्यपणा ; अविनाशी पदार्थ . [ सं . अ + सत ]
 वि.  
   खरें नव्हें तें ; खोटें ; असत्य ; मिथ्या ; अवास्तव ; विनाशी ; ज्याला अस्त्वि नाहीं तें ; काल्पनिक ; अस्सल नव्हे तें . तैसी सत ना असत होये । - ज्ञा १५ . ८१ . तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । - ज्ञा १७ . ३८० . [ सं . ]
   वाईट ; दुष्ट ; असाधु ; खट्याळ .
   अन्याय ; अयोग्य ; सामाशब्द - असन्मित्र = खोटा मित्र , प्रसंगीं उपयोगी न पडणारा मित्र . असद्विद्या = कुविद्या ; पिशाचविद्या ; दु : शास्त्र . असन्मार्ग = कुमार्ग , अनिष्ट - वाईट मार्ग ; असदव्यापार - व्यवहार = वाईट - मूर्खपणाचीं कर्मे - प्रघात . असदभाव = दुष्टस्वभाव . असत्कर्म ; असत्पथ ; असत्पुत्र ; असत्संगर्ग ; असद्विचार ; असदाचार ; असदवृत्ति इ० [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP