मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
द्यूतप्रसंग

गीत महाभारत - द्यूतप्रसंग

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


राजसूय यज्ञ करणारा धर्मराजा सर्वश्रेष्ठ राजा, मोठा सम्राट ठरला. त्याचा सर्व उपस्थित ऋषींनी, देशोदेशीच्या राजांनी मोठा सन्मान केला. त्या यज्ञप्रंसगी राजा दुर्योधनाने युधिष्ठिराच्या आदेशानुसार नजराण्यांच्या रुपाने मिळालेल्या सुवर्ण रत्‍नादी अगणित संपत्तीचा स्वीकार केला. ती अफाट संपत्ती व युधिष्ठिराचे राजवैभव पाहून दुर्योधनाचा जळफळाट झाला. त्या संपत्तीकडे पाहून त्याला क्षणभरही चैन पडेना. त्यानंतर मयसभेतल्या अपमानाचे शल्यही त्याला बोचत होते. परतीच्या प्रवासात त्याने शकुनिमामाला आपली मनोव्यथा सांगितली. शकुनी तर कुटिल नीतीत प्रवीण होता. दुर्योधनाच्या मनात हेच घोळत होते की ती संपत्ती आपल्याला कधी मिळेल. शकुनीने त्याचे सांत्वन करीत त्याला कानमंत्र दिला की ती संपत्ती द्यूतक्रीडेत हिसकावून घेता येईल. त्यानंतर द्यूताचे सर्व कारस्थान त्या दोघांनी रचले; धृतराष्ट्रातर्फे युधिष्ठिराला द्यूतासाठी निमंत्रण पाठविले. युधिष्ठिराला कल्पनाही नव्हती की आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे.

द्यूतप्रसंग

राजसूयाच्या प्रसंगी नेमिले दुर्योधना

ग्रहण करण्या भेटवस्तू, अश्व रत्‍नादी धना ॥१॥

पांडवा राजे खुषीने करित जे जे अर्पण

जाहला गिरि त्या धनाचा चकित हो दुर्योधन ॥२॥

स्वर्गलोकी इंद्र जैसा धर्म तैसा शोभला

कौरवाधिप पाहुनी हे मत्सराने पेटला ॥३॥

खिन्न होऊन शल्य मनिचे सांगतो तो मातुला

"द्यूत खेळुन जिंक त्यांना" मार्ग त्याने दाविला ॥४॥

"बोलवी कुंतीसुताला द्यूत त्यासी प्रिय असे

निपुण मी द्यूतात मत्सम या जगी कोणी नसे" ॥५॥

द्यूतक्रीडेसी निमंत्रण धर्मराजासी दिले

हाक ही होती कलीची नाहि कोणी जाणिले ॥६॥

दोष द्यूतातील जाणे धर्मसुत, परि येतसे

संकटाचा काळ येता क्षीण बुद्धी होतसे ॥७॥

टाकता फासे पटावर वश्य जणु ते कौरवा

डाव जिंकत जाइ शकुनी खेद होई पांडवा ॥८॥

होउनी बेधुंद द्यूती, भान धर्माला नसे

हरत गेला - सर्व हरला - सर्व त्याचे जे असे ॥९॥

लाविले त्याने पणाला अर्जुनादी बांधव

चकित सगळे पाहुनी द्यूतातले हे तांडव ॥१०॥

डाव हाही धर्म हरला, दैव जणु विपरीतसे

म्लान झाले सर्व पांडव, काळ कष्टाचा दिसे ॥११॥

त्याक्षणी शकुनी वदे त्या ’नाहि तू निष्कांचन

भाग्य कोणी जाणले रे लाव भार्येचा पण"

अंध जणु होऊन राजा लावि सम्राज्ञी पणा

कोसळे जणु वीज खाली भेदुनी तारांगणा ॥१३॥

ओरडा झाला जनी त्या, डाव शकुनी जिंकतो

कौरवांचा दास झाला कालचा सम्राट तो ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP