मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
मायाबापापुढें बाळकाचा घात...

संत तुकाराम - मायाबापापुढें बाळकाचा घात...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


मायाबापापुढें बाळकाचा घात । आपणा देखत होऊं नेदी ॥१॥

काय मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक तुझे हातीं ॥२॥

वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान्ह भूक वाहे कडे खांदीं ॥३॥

तुका म्हणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥४॥


References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP