मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
नाहीं एसें गांठी पुण्य । ...

संत तुकाराम - नाहीं एसें गांठी पुण्य । ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


नाहीं एसें गांठी पुण्य । जेणें घडे दरुषण करुनी चिंतन । काळ सारुं या रीती ॥१॥

नाचेन या संतांपुढें । लाज सांडुनी उघडें । सेवीन तो कोडें । उच्छिष्ठाचा प्रसाद ॥२॥

घालूनियां कास । होइन मोकळा उदास । करुं ब्रह्मरस । सेवन हा आनंदें ॥३॥

आला तोचि घ्यावा । होइल संचिताचा ठेवा । पुढिलाचा हेवा । तुका म्हणे अनुचित ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP