बहु गर्भवासीं । सोसें मेलों उपवासी । नाहीं सखी ऐसी । तेथें कोणी भेटली ॥१॥
करीं करीं रे स्वहित । देह तंव हें अनित्य । नाहीं दिल्हें चित्त । सोडवुं मोहापासुनी ॥२॥
पाळी तोंडाचिया घासें । तेचि होये अनारिसें । ज्याच्या नव्हे ऐसें । खेदीं परी सोडवीना ॥३॥
तुका ह्मणे धन मानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिल्हा जनें । देखों लोभें हा लाभ ॥४॥