संत तुकाराम - जोडोनियां कर । उभा राहिलो...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥

एकाविण एका । वेचें मोल होतें फुका ॥२॥

काळिमेनें राती । दिवस कळा आली होती ॥३॥

उंचनीच गारा । हिरा परीस मोहरा ॥४॥

विषें दाविलें अमृत । कडू गोड घात हित ॥५॥

तुका म्हणे भले । तैसे नष्टानें दाविले ॥६॥

N/A


References : N/A
Last Updated : March 21, 2008