संत तुकाराम - स्वार्थ परमार्थ संपादिले ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


स्वार्थ परमार्थ संपादिले दोन्ही । एकही निदानीं नव्हे त्यासी ॥१॥

दोहों पेंवांवरी ठेवूं जातां हात । होय अपघात शरीराचा ॥२॥

तुका म्हणे त्यासी दोहींकडे धोका । शेवटीं नरकामाजी पडे ॥३॥

N/A


References : N/A
Last Updated : March 21, 2008