संत तुकाराम - वेधियेलें मन विसरलें देह ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


वेधियेलें मन विसरलें देह । पतिसुतगेह धन वित्त ॥१॥

नाठवेचि भोग नाना उपचार । पडला विसर वासनेचा ॥२॥

चिंता भय लज्जा निमालें हें दुःख । वोसंडलें सुख ब्रम्हानंद ॥३॥

विसरलें मान पीडा करी जन । दिसे नारायण विश्वा माजी ॥४॥

तुका म्हणे देह दिला पंढरीशा । तेव्हां ऐसी दशा अंगा आली ॥५॥

N/A


References : N/A
Last Updated : March 21, 2008