मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
मंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...

संत तुकाराम - मंडित चतुर्भुज दिव्य कर्ण...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


मंडित चतुर्भुज दिव्य कर्णीं कुंडलें । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकलें ॥१॥

ओंवाळूं गे माय विठ्ठल सवाई साजिरा । राई रखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ध्रु०॥

वैजयंती माळ गळां शोभे सीमंत । शंख चक्र गदा पद्म आयुधमंडित ॥२॥

सांवळा सकुमार जैसा कर्दळी गाभा । चरणींचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥३॥

वोवाळितां मन उन्मन जाहलें ठायीं । समदृष्टी समाधि तुकया लागला पायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP