मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
तीन शिरें सहा हात । तया म...

संत तुकाराम - तीन शिरें सहा हात । तया म...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


तीन शिरें सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥

काखे झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥

माथां शोभे जटाभार । अंगीं विभूति सुंदर ॥३॥

शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥

तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP