संत तुकाराम - पताकांचे भार मृदंगांचे घो...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


पताकांचे भार मृदंगांचे घोष । जाती हरिचे दास पंढरीसी ॥१॥

लोकांची पंढरी आहे भूमीवरी । आम्हा जाणें दुरी वैकुंठासी ॥२॥

कांहीं केल्या तुम्हा उमजेना वाट । म्हणूनि बोभाट करुनी जातों ॥३॥

मग पुढें रडाल कराल आरोळी । तुका कदा काळीं मागें नये ॥४॥

N/A


References : N/A
Last Updated : March 21, 2008