स्थळ रितें संतां विण । तेंचि जाणावें स्मशान ॥१॥
तेथें राहूं नये कधीं । मूळ विचारीं रे आधीं ॥२॥
जेथें दत्त दत्त घोष । तेथें मना वाटे तोष ॥३॥
शास्त्रश्रवण सत्कथा । तेणें जावें मोक्षपंथा ॥४॥
नसे वाटाडया सद्गुरु । पावे कैंचा पैल पारु ॥५॥
’रंग’ संतपदीं लीन । मागे दास्यत्वाचें दान ॥६॥