द्वैताद्वैत सर्व खोटें । पैल रुप तें गोमटें ॥१॥
नाहीं रुपरंग जेथें । गुण आकृति वोखटें ॥२॥
सर्वां विसरुनी जावें । तेव्हां आपें तेंचि व्हावें ॥३॥
व्हावें परी जें नेणावें । नेणुनीचि तें जाणावें ॥४॥
जेथें जाणणें नेणणें । व्यर्थ श्रम हें बोलणें ॥५॥
मन वाणी पैल रंग । दृश्यादृश्य सर्व सोंग ॥६॥
अवघा मायेचा बाजार । क्षराक्षरातीत पर ॥७॥
सर्वाधार सर्वा विण । ’रंग’ व्यर्थ वाणी शीण ॥८॥