मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल...

अभंग ५९ - भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआलेसंवत्सरी ॥ ब्रह्मानंदपरोपरी ॥ चरणधरीसोपानदेव ॥१॥

भागीरथीसवेसरिता ॥ धावुनीआलीगंगामाता ॥ यमुनासरस्वतीउभयता ॥ एकात्मताकरेमाजी ॥२॥

इंद्रचंद्रतेतीसकोटी ॥ नवनाथसिद्धसौंगडी ॥ भक्तसनकादिकप्रौढी ॥ वेदपरवडीगर्जती ॥३॥

गगनामाजीदेवांगना ॥ वर्षावकरितीदिव्यसुमना ॥ म्हणेनिवृत्तिनाथसोपाना ॥ चरणावरीठेवीतू ॥४॥

पुष्पकारूढझालेदेव ॥ आणिकमागुतीआलेसर्व ॥ म्हणेपांडुरंगदेवसदैव ॥ सोपानदेवबाळमूर्ती ॥५॥

इंद्रनीळपर्वताआहे ॥ तेथूनठावजावयापाहे ॥ सप्तपाताळीशेषवाहे ॥ दीर्घदेहफणीअसे ॥६॥

जाऊनित्यासीश्रुतकरावे ॥ गरुडासीबोलिलेदेवराव ॥ मार्गीचालिलालवलाहे ॥ क्रमीतजावेसप्तपाताळी ॥७॥

नामाम्हणेअमृतकरी ॥ मुखकुरवाळुनीश्रीहरी ॥ सोपानसमाधीभीतरी ॥ आपणपुढारीबैसले ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP