मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
मगसंतोषझालाहरिभक्ता ॥ ज्...

अभंग २९ - मगसंतोषझालाहरिभक्ता ॥ ज्...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


मगसंतोषझालाहरिभक्ता ॥ ज्ञानदेवझालाबोलता ॥ निवृत्तीसीम्हणेजावेआता ॥ त्रिंबकशिखराशी ॥१॥

करानमस्कारहरिसी ॥ वेगीजावेवैकुंठासी ॥ नित्यहरिचरणांपासी ॥ तुम्हीआम्हीसोपान ॥२॥

मुक्ताम्हणेज्ञानदेवा ॥ मजविठोबासीनिरवा ॥ मजवरीलोभअसोद्यावा ॥ रुक्मिणीमाताआदिकरूनी ॥३॥

पुंडरीकासनिरवावे ॥ समस्तासक्षेमसांगावे ॥ रुक्मिणीमातेच्याहातीद्यावे ॥ मजज्ञानदेवा ॥४॥

ज्ञानेकरूनविज्ञान ॥ भक्तिसीकरावेनिरोपण ॥ द्यावेसमाधीसंजीवन ॥ यावेशीघ्रव्रत ॥५॥

निवृत्तिनेदिधलेउत्तर ॥ आम्हीयेऊनीवेगवत्तर ॥ सोपानासीमार्गीनिरंतर ॥ समाधीसीचालवुनी ॥६॥

तवबोलिलायादवराणा ॥ तुम्हीसमाधीच्यामागितल्याखुणा ॥ परिनामयावरजाणा ॥ माझीकासवदृष्टी ॥७॥

नामाम्हणेविठोबासी ॥ तूस्वामीदीनाचाहोशी ॥ गेलेनिधानज्ञानदेवदाखवीसी ॥ मजनयनीप्रत्यक्ष ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP