मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर...

अभंग ४१ - ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नरूपेमाधव ॥ मगबोलतीज्ञानदेव ॥ विठ्ठलाप्रती ॥१॥

धन्यधन्यतूविठ्ठला ॥ धन्यप्रत्यक्षदेखिला ॥ धन्यसमारंभयेथिला ॥ सोहळाहरीभक्तांचा ॥२॥

तुझेनिआम्हीधन्य ॥ हेजगत्रयीदेवामान्य ॥ म्हणतीभक्तासमान ॥ नदेखोत्रिभुवनी ॥३॥

तूविश्वात्माविश्वरूप ॥ तूजगाचेनावरूप ॥ तुजनलिंपेपुण्यपाप ॥ सदाशुद्धबुद्धाससी ॥४॥

तूआम्हाभक्तांसरिसा ॥ सवेहिंडसीजगदीशा ॥ तुजविणअष्टदिशा ॥ मजशून्यवाटती ॥५॥

तरीतूपाळिसीभक्तलळा ॥ समाधीचासोहळा ॥ तोदाखविलामजडोळा ॥ दिव्यदृष्टीदेउनी ॥६॥

तूसत्त्वरजतमात्मक ॥ तूसकळजीवांचाचाळक ॥ तूत्रिमूर्तिअवघायेक ॥ विराटस्वरूपसकळ ॥७॥

भक्तभाग्यभूमीतळी ॥ याकारणेतूवनमाळी ॥ दहाअवतारभूमंडळी ॥ नानाचरित्रेखेळसी ॥८॥

ऐसेमहिमान अगाध ॥ तूतुझेरूपप्रसिद्ध ॥ कोणभाग्याचामीप्रबुद्ध ॥ तोतूमजकारणेआलासी ॥९॥

नामाम्हणेज्ञानदेवे ॥ ऐसीस्तुतीकेलीस्वभावे ॥ तवकृपाकरूनियादेवे ॥ अभयकरदीधला ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP