मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स...

अभंग ४६ - बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ सर्वदेवपहातीनयनी ॥ वर्षावकरितीदिव्यसुमनी ॥ विष्णुभुवनीप्रत्यक्ष ॥१॥

विठोबाकृपाळुगुणनिधी ॥ पुंडलिकासवेभक्तांचीमांदी ॥ लधिमामहिमाअणिमाआदी ॥ कामारिसिद्धितिष्ठती ॥२॥

निश्चयेकरूननेमिलीतिथी ॥ कृष्णपक्ष अष्टमीसमर्थी ॥ नामसंकीर्तनसंतसंगती ॥ तोब्रह्मप्राप्तीपावला ॥३॥

नवमीगजरहरिनामाचा ॥ तोचिवैष्णवकायामनवाचा ॥ तोप्रत्यक्षविष्णुरूपसाचा ॥ सत्यत्रिवाचाबोलिले ॥४॥

जोडेजावयावद्यदशमी ॥ ध्यानविष्णुपूजनस्वधर्मी ॥ तोसत्वरपावेलनिजधामी ॥ नामसंभ्रमीनाचत ॥५॥

व्रतएकादशीश्रेष्ठगाढी ॥ कीर्तनश्रवणीकोटियोगजोडी ॥ एकएकघडीकल्पायेवढी ॥ भूषणप्रौढीकीर्तीची ॥६॥

द्वादशीपारणक्षीराब्धी ॥ हरिकीर्तनीपरमानंदी ॥ तोपदपावलाअनादी ॥ ज्ञानदेवीविष्णूच्या ॥७॥

वद्यत्रयोदशीमहाथोरगजर ॥ कुचगरुडटकेदिंडीसंभार ॥ वाजतीटाळमृदंगझणत्कार ॥ हरिनामेअपारउद्धरिले ॥८॥

नामाम्हणेवद्यचतुर्दशी ॥ पुढतीअमावस्येचेदिवशी ॥ ज्ञानदेवादृढधरीजोमानसी ॥ तोकृतनिश्चयेतरेल ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP