सर्वतीर्थेमिळालीअनंते ॥ तेसुखीकरूनिकृतार्थे ॥ संवत्सराजावोनिसोपानाते ॥ समाधीसीबैसवू ॥१॥
अनंतसुखाचियाराशी ॥ तूदिल्याभक्ताचियामानसी ॥ आनंदझालापुंडरिकासी ॥ मगनबोलेकाही ॥२॥
सोपानम्हणेवैकुंठा ॥ विवेकियामाजीश्रेष्ठा ॥ संवत्सरग्रामकर्हातटा ॥ वैकुंठासहितचलावे ॥३॥
इंद्रचंद्रब्रह्मादिदेव ॥ आणिगणमिळालेसर्व ॥ ततीसकोटिदेव ॥ विमानीआरूढलेदेखा ॥४॥
निवृत्तिसोपानज्ञानदेव ॥ त्रिमूर्तीतिन्हीदेव ॥ धर्मरक्षणार्थपहाहो ॥ मनुष्यरूपेअवतरले ॥५॥
तिघेहीउभेसन्मुख ॥ तिघांहीथोरसंतोष ॥ विनवितीकेशवास ॥ स्वामीविनंतिअवधारिजे ॥६॥
येअळंकापुरीसी ॥ स्थापावेकोटितीर्थासी ॥ जोजोभक्तयेईलस्नानासी ॥ त्यासीवैकुंठाआणावे ॥७॥
ऐसेऐकोनीश्रीहरी ॥ म्हणेधन्यतुमचीवैखरी ॥ जगदोद्धारकेलाससंसारी ॥ बावीसवरुषेअसंतापै ॥८॥
जोजोदिवसउगवला ॥ तोतोज्ञानदेवेसफळकेला ॥ पदपदांतरकथिला ॥ जेणेआत्मारामसंतोषे ॥९॥
पूर्वीअनंतभक्तजाहले ॥ पुढेहीभविष्यबोलिले ॥ परीनिवृत्तीसीसोपानेसोडविले ॥ अपारजीवजंत ॥१०॥
मनुष्यपणअग्रणी ॥ ज्याचाभारनसाहेमेदिनी ॥ मगइहीअवतारघेउनी ॥ जगतारिलेकीर्तीने ॥११॥
नामापंढरीसनाचत ॥ ज्ञानेश्वरअळंकापुरीशोभत ॥ सोपानसत्वरीमिरवत ॥ निवृत्तीत्रिंबकशिखरी ॥१२॥