ऐसेबोलोनियाहरी ॥ रुक्मिणीसीविचारकरी ॥ यासीभोजनेपरोपरी ॥ अन्ननिपजवावी ॥१॥
संतोषझालाहरीभक्ता ॥ जेथेस्वयेहरीभोक्ता ॥ कर्ताआणिकरविता ॥ सर्वचाळकविठ्ठल ॥२॥
तवदिव्यग्राम उभारुनी ॥ भक्तीदेखीलेनयनी ॥ विश्वकर्मायेउनी ॥ उत्तरपंथेनिर्मिले ॥३॥
तवअष्टमहासिद्धी ॥ सर्वसामग्रीचीसमृद्धी ॥ करजोडोनकृपानिधी ॥ विनवितीआनंदे ॥४॥
दिव्यवनेदिव्यवल्ली ॥ दिव्यसुमनेसमग्रजाली ॥ वैकुंठीहुनीआली ॥ महाविष्णुकारणे ॥५॥
तेथेसुगंधपरिमळ ॥ जवादिकस्तुरीनिर्मळ ॥ चिंतामणीदेतढाळ ॥ नानाकीवदीप्तीचे ॥६॥
चंदनाचेखांब उभारिले ॥ पवळवेलीचेशोभले ॥ मुक्ताफळांचेघोसमिरवले ॥ रत्नखचितदामोदरे ॥७॥
चंपकसुमनाचीहारी ॥ शेवंतीमोगरेनानापरी ॥ नानापुष्पीपरिमळ आगरी ॥ दिव्यवनेशोभती ॥८॥
ऊसखजूरियापोफळ ॥ फणसनारिंगेनारिकेळ ॥ कर्दळीवाढलियासरळ ॥ उदकपाटवहाताती ॥९॥
तेथेभ्रमररुणुझुणकरिती ॥ गोपाळवेणुवाजविती ॥ नानापरीवागडेधरिती ॥ देवपहातीविमानी ॥१०॥
तेथेयोगियाचीध्याने ॥ निश्चळराहिलीआसने ॥ निवृत्तिसोपान ॥ तेथेदोकडेउभेअसती ॥११॥
नामाजातोलोटांगणी ॥ वैकुंठउतरलेमेदिनी ॥ अलंकापूरपाटणी ॥ उत्तरपंथेदेखिले ॥१२॥