मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं...

अभंग ५७ - उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


उगवलादिनप्रभात ॥ स्नानसंध्यासारूनसमस्त ॥ उद्धवकरजोडूनबोलत ॥ पूर्ण आर्तसर्वांचे ॥१॥

अमूपयेथींचामहिमा ॥ नबोलवेझालीसीमा ॥ आताचलावेगीपुरुषोत्तमा ॥ आपुलेआश्रमापंढरीसी ॥२॥

गरुडसामोरातिष्ठत ॥ भक्तभागवतसमस्त ॥ मुनीपुंडलीकविनवित ॥ केलेदंडवतसाष्टांगी ॥३॥

म्हणेज्ञानदेवयजुर्वेदी ॥ वागश्रेष्ठवारबुद्धी ॥ परापश्यंतीवैखरीसमाधी ॥ त्यामंत्रोदकेदिली ॥४॥

ऐसाचीसोपानमार्ग ॥ तूकरितापांडुरंग ॥ ग्रामलेखनाचाप्रसंग ॥ निरोपिलासांगकुळयाती ॥५॥

सकळवंशपरंपरा ॥ नसांडावेतुम्हीआचारा ॥ आम्हीजातोसंवत्सरा ॥ पंढरपुरासांग ॥६॥

सकळाआलिंगनदिले ॥ गरुडावरीआरूढले ॥ ज्ञानदेवानीहरीचीपाउले ॥ दृढधरिलीनिरंतरे ॥७॥

नामानाचेहरिद्वारी ॥ आनंदझालाअलंकापुरी ॥ विठोबाचीलीलापंढरी ॥ रामकृष्णगर्जती ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP