मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग...

अभंग ५८ - मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ गगनक्रमितगेलाप्रचंडे ॥ वरीआरूढलेप्रचंड ॥ भक्तपुंडलिकासहित ॥१॥

पक्षाचेनिफडत्कार ॥ ग्रामटाकिलेसंवत्सर ॥ पाठारावरीकर्‍हेतीर ॥ जयजयकारेगर्जिन्नले ॥२॥

त्याकाळीसमारंभकेला ॥ महाउत्सवहरीसीझाला ॥ आनंदगजरप्रवर्तला ॥ दिव्यविमानेमेळाउतरला ॥३॥

दृष्टिदेखावयाकौतुक ॥ शिवगणाआलेसकळिक ॥ कर्ताब्रह्मांडनायक ॥ महिमाअधिकसंतांचा ॥४॥

मुनीपुंडलीक उतरला ॥ संगातीवैष्णवांचामेळा ॥ समाधीसुखाचासोहळा ॥ सकळकळावर्ततसे ॥५॥

हातेखणोनीभूमिका ॥ अमृतशिंपुनीसुगंधिका ॥ ध्वज उभारूनीपताका ॥ गरुडटकाकुंचडोलती ॥६॥

नामाम्हणेसुखसंगती ॥ वैष्णवहरिनामेगर्जती ॥ लक्षुनीनारायणप्रीती ॥ उतरोनीक्षितीसमाधी ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP