ऐकोनिनिवृत्तिस्थिरावला ॥ महाविष्णुपरमसंतोषला ॥ मनेसोपानदेवांनीआदरिला ॥ संवादस्तुतिलापरिसा ॥१॥
जयजयातूरामकृष्णा ॥ भक्ताभाविकहरितृष्णा ॥ देहेदीपकसहिष्णा ॥ कृष्णकृष्णकृष्णम्हणताती ॥२॥
नरहरीनामनरकेसरी ॥ वाजवूनीटाळियेटाळी ॥ टाळमृदुंगझणत्कारी ॥ जयजयहरीम्हणूनआम्ही ॥३॥
येकहरिआम्हासखा ॥ नाहीत्रिभुवनामाजीदेखा ॥ समाधीस्वरूपध्यानसखा ॥ चरणसुखाविनटलो ॥४॥
धन्यधन्यभूमिकादेश ॥ स्वयेआपणजगन्निवास ॥ ज्ञानदेवेकेलावास ॥ समाधीआसधरूनी ॥५॥
निवृत्तीमहाराजश्रीगुरुथोर ॥ समाधीकारणझालेस्थिर ॥ पुढेकोणकैसाझालाविचार ॥ सांगानिर्धारस्वामिया ॥६॥
देवम्हणेब्रह्म अवतार ॥ अवघीयासीतूचराचर ॥ श्रेष्ठपणातुम्हिनिर्धार ॥ आलेआकारासगुरुरूप ॥७॥
सकळ असेतूव्यापक ॥ स्वर्गलोकमृत्युलो ॥ अधर्मजालियाचाळक ॥ पुढतीएकरूपधरिले ॥८॥
ऐसेबोलूनपांडुरंग ॥ सोपाननिवालासर्वांग ॥ साकडेफेडितोश्रीरंग ॥ आमुचेअंतरंगजाणोनी ॥९॥
नामाम्हणेसोपानदेव ॥ स्तुतिआदरिलीसद्भाव ॥ निजस्वहितस्वानुभव ॥ समाधीठावसंस्थिर ॥१०॥