मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| सुदाम चरित्र चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० सुदाम चरित्र तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत सुदाम चरित्र Translation - भाषांतर ॥८१८९॥ऐका हो तुह्मी भावीक हो जन । दासा नारायण सांभाळितो ॥१॥सुदामा ब्राह्मण संसारीं कष्टला । स्मरुं तो लागला कृष्णजीला ॥२॥तयेवेळीं कांता पुसे सुदाम्यासीं । स्मरतां कोणासी वेळोवेळीं ॥३॥तयाचा वृत्तांत ऐका सविस्तर । जोडीतसे कर तुका ह्मणे ॥४॥॥८१९०॥संसारी असतां बहु दु:खी झाला । मग तो स्मरला तुज देवा ॥१॥स्त्रियेपाशीं सांगे ऐक वो सुंदरे । मित्र माझा खरा कृष्णनाथ ॥२॥तयाचे दर्शना जाईन मी आतां । आह्मासी सर्वथा चिंता नाहीं ॥३॥तयेवेळीं कांता ह्मणे सुदाम्यासीं । मित्र हृषीकेशी तुह्मां ऐसा ॥४॥तरी कां आह्मासी ऐशी झाली परी । उपवास घरीं पडताती ॥५॥येरु ह्मणे आतां जावें त्याचे भेटी । मग जगजेठी उपेक्षीना ॥६॥कांहीं तरी देई सत्वर मजसी । तयाचे भेटीसी न्यावयाला ॥७॥तुका ह्मणे तुह्मा ठाउका वृत्तांत । काय घराआंत आहे ऐसें ॥८॥॥८१९१॥स्त्रियेलागीं ह्मणे मित्र माझा हरी । त्याचा तों अंतरीं आवडीनें ॥१॥येरी ह्मणे त्याचे जावें आतां भेटी । बहुत हिंपुटी झालों आह्मीं ॥२॥तीन मुष्टी पोहे आणिले उसनें । पतीकरीं तीनें दिधले शीघ्र ॥३॥तुका ह्मणे आतां ब्राह्मण चालिला । आनंद तो झाला समर्थासी ॥४॥॥८१९२॥वाटेसीं चालता प्रश्न झाला चांग । ह्मणे पांडुरंग तुष्टला हो ॥१॥ऐसा तो पावला द्वारके चालला । आल्हाद तो झाला ब्राह्मणासीं ॥२॥येरु ह्मणे सांगों गेले द्वारपाळ । सांगती सकळ वृत्तांतातें ॥४॥॥८१९३॥श्रीकृष्णनाथा सांगितली मात । आला हो अतीत द्विज एक ॥१॥सांगतसे नाम आपुलें सुदामा । काय आज्ञा आम्हा करीतसां ॥२॥श्रवणीं पडतां तयाचें वचन । गेले नारायण धांवोनियां ॥३॥तुका म्हणे हरी प्रीतीनें भेटला । घेऊनीयां आला राऊळासी ॥४॥॥८१९४॥सुदाम्यासी देव प्रीतीनें पुसती । तुझी गृहस्थिति काय आहे ॥१॥येरु ह्मणे लाज वाटतसे मला । गृहीं बाळकांला भुक्ति नाहीं ॥२॥वहिनीनें आम्हां काय पाठविलें । द्यावें तें वहिलें सत्वरची ॥३॥तीन मुष्टी पोहे आणुनीयां दिल्हे । आनंदे भक्षिले देवरायें ॥४॥तुका म्हणे देव भक्तांचा बांधला । आवडी विठ्ठला भावरुची ॥५॥॥८१९५॥आनंदें करुनि सुदामा पूजिला । दिलीं वस्त्रें त्याला आदरेसीं ॥१॥अलंकार त्याला केले परिपूर्ण । सर्व समाधान ब्राम्हणासी ॥२॥विश्वकर्मा पाचारुनि आणीयेला । नगरी सुदाम्याला सिद्ध करी ॥३॥दुसरी द्वारका देवें रचियेली । तुका म्हणे केली मात तेणें ॥४॥॥८१९६॥मागील आठव झाला सुदाम्यासीं । आज्ञा हृषीकेशी द्यावी मज ॥१॥ते वेळे ती माव केली नारायणें । सुदाम्यासी म्हणे ऐका एक ॥२॥वाटे तस्करांचा उपद्रव फार । वस्त्रें अलंकार ठेवी येथें ॥३॥तुका म्हणे द्विजें ठेवीयेलीं वस्त्रें बहुत गहिवरें चालिला तो ॥४॥॥८१९७॥सुदामा ब्राम्हण वाटेसी चालतां । करीतसे चिंता वेळोवेळीं ॥१॥जाऊनीयां काय सांगूं स्त्रियेपाशीं । आतां असो ऐसी बरोबरी ॥२॥कृष्ण हा चोरटा शिंदळ ठाईचा । ठाऊक पूर्वीचा मज आहे ॥३॥तुका म्हणे कष्टें द्विज तो चालिला । पुढें हा देखीला ग्राम थोर ॥४॥॥८१९८॥वाटेसी तो पुसे पुढें कोण ग्राम । काय याचें नाम ऐसें सांगा ॥१॥येरु म्हणे तुझें काज नाम असे । लोक सुदामा ऐसें म्हणताती ॥२॥वाट मी चुकलों न कळेची वाट । द्वारकेची भेट दिसतसे ॥३॥तेणें ओळखूनी आपलाची स्वामी । नेला निजधामीं धरुनियां ॥४॥तुका म्हणे स्वामी कृपेचा सागर । न कळेची पार ब्रम्हादिकां ॥५॥॥८१९९॥सकळही जन करिती आरती । भावें ओंवाळीती सुदाम्यासी ॥१॥ते वेळीं सुदामा झाला तो विस्मित । व्यर्थ कृष्णनाथ निंदिला म्यां ॥२॥कृपावंता तुझी न कळेचि माव । अल्प माझा भाव तुझे ठायीं ॥३॥कृपेचा सागर तूंचि नारायण । तुका ह्मणे जान भाविकांचा ॥४॥॥८२००॥न कळेचि घर झाला असे भ्रांत । वैभव अद्भुत देखोनियां ॥१॥कांता आली भेटे श्रृंगार करुनि । मानुनी भवानी पायां लागे ॥२॥झांकियेले नेत्र न बोलेचि कांहीं । हालवूनि बाही जागें करी ॥३॥गेला तो येथूनि भेटला जगजेठी । तेणें कृपादृष्टी पाहियेलें ॥४॥तुका म्हणे दिला सुवर्णाचा गांव । उच्चारितां नांव गोविंदाचें ॥५॥॥८२०१॥आठवा येतांचि झालासे सावध । नाटकी गोविंद बहु असे ॥१॥न कळतां तुज निंदिलें म्यां देवा । अन्याय करावा क्षमा माझा ॥२॥अपराध अनंता किती सांगूं माझा । वाटतसे लाज निंदिल्याची ॥३॥तुका म्हणे कृष्णकृपेचा सागर । रखुमादेवीवर पांडुरंग ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP