मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे|

परशुराम अवतारचरित्र

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७९९४॥
भारावली मही दाटली असुरीं । आकांतली हरी शरण गेली ॥१॥
गाईब्राह्मणांचें झालेंसें हनन । पिडावले जन दु:खी सदा ॥२॥
तेव्हां दयासिंधू मातेचें वचन । धेनूचें गार्‍हाणे सत्य करी ॥३॥
धांवोनी फरशपाणी हृषीकेशी । सहस्त्रबाहूसी मारियलें ॥४॥
नि:क्षत्री हे धरा केली एकवेळा । एकवीस वेळा पांडुरंगा ॥५॥
मारियले दुष्ट रक्षियले भक्त । तारीले पतीत कृपादृष्टी ॥६॥
तुका ह्मणे तुझे पवाडे असंख्य । तेथें मी मश्यक काय वानूं ॥७॥

॥७९९५॥
दयासिंधुपणें उदारांचा राणा । धरा दिली दाना ब्राह्मणांसी ॥१॥
तिहीं त्रिभुवनीं हिंडोनी पाहतां । नाहीं पै मागता ऐसें केलें ॥२॥
दु:ख पीडा रोग व्याधि क्लेश चिंता । स्वप्नीं तेही वार्ता नायकती ॥३॥
हारपला द्वेष पळालें दरिद्र । आनंद समुद्र वोळलासे ॥४॥
तुका ह्मणे तेथें होतो मी मागुता । थोडेंसें संचित आलें मज ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : July 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP