मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|चरित्रे| धांवा द्रौपदीचा चरित्रे नृसिंहअवतारचरित्र प्रल्हादचरित्र श्रीवामन अवतारचरित्र परशुराम अवतारचरित्र श्रीरामजन्म श्रीरामचरित्र सीताशोक श्रीकृष्णजन्म कृष्णचरित्र १ कृष्णचरित्र २ कल्की अवतार कालयवनवध रुक्मांगद राजाचें चरित्र अंबऋषी राजाचें चरित्र भानुदास चरित्र श्रीयाळ चरित्र धांवा द्रौपदीचा मयुरध्वज चरित्र सुदाम चरित्र दामाजीपंताचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र चोखामेळ्याचें चरित्र दुसरें द्रौपदी वस्त्रहरण सांवतामाळीचरित्र हरिपाळचरित्र ८२४१ ते ८२५० ८२५१ ते ८२६० ८२६१ ते ८२७१ ८२७२ ते ८२८० ८२८१ ते ८२९० धांवा द्रौपदीचा तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगचरित्रतुक्राराममराठीसंत धांवा द्रौपदीचा Translation - भाषांतर ॥८१८४॥धर्म द्वेष करी सदा दुर्योधन । धाडीला छळानें वनवासा ॥१॥तरी दुष्टबुद्धी न राहे उगला । नानापरी घाला घालीतसे ॥२॥दैवें काळ आला दुर्वास आश्रमा । आपुल्या स्वकामा इच्छिलासे ॥३॥मागितल्या वेळे सिद्ध पदार्थासी । आणूनि आंगेसी दास्य करी ॥४॥कोपभेणें सर्वकाळ सावधान । हस्त ते जोडून उभा असे ॥५॥बहु दिन झाले नेमासी न टळे । झालिया कृपाळू ऋषी त्यासी ॥६॥मग ह्मणे नष्ट धर्म छला वनीं । सुकृतासी हानी करा त्याच्या ॥७॥अवश्य ह्मणोनि उठला सत्वर । शिष्यादि सहस्त्र साठी संगें ॥८॥आला छळावया वनांत दुर्वास । दोन प्रहरास रात्र झाली ॥९॥गर्जना ऐकतां उठले सकळ । वंदिले तत्काळ धर्मादिकीं ॥१०॥सांगती क्षुधित कोप माझा ठावा । विलंबासी तेव्हां शापीन मी ॥११॥मार्गी येतां स्नान कर्म सांगमंत्र । सारीतां हे रात्र झाली माजी ॥१२॥तुका ह्मणे ऋशी धाडोनियां स्नाना । तेव्हां नारायणा आठविलें ॥१३॥॥८१८५॥करुनियां स्नान वृंदावनीं उभी । लक्ष पद्मनाभीं ठेवियलें ॥१॥यथाविधी मनीं आठविले पाय । उठे देवराय लगबग ॥२॥न करी आळस प्रिया एकांतासी । रात्री दुर देशीं न विचारी ॥३॥सांडुनी गरुड धांवे नग्न पायीं । क्षुधिलो मी आई देई आतां ॥४॥ऋषीलागीं तुझा पुकारिला धांवा । तुजसाठीं देवा ह्मणूं कोण ॥५॥असेल जे शिळें उरलें जें कडें । वोढविला पुढें हात देत ॥६॥आणिनियां दावी दृष्टी पाकपात्र । कृष्ण ह्मणे तत्र आहे कांहीं ॥७॥पाहे तंव शाखा देंठ लावियला । हात पसरिला त्यांत घाली ॥८॥ह्मणे कृष्णार्पण देव घाली तुळशी । तेणें विश्व सुखी धालेपणें ॥९॥दिधला ढेंकर उदक तुळशी । तेणें हृषीकेशी संतोषला ॥१०॥संतोषला देव तृप्त केले ऋषी । न कळे कोणासी विंदान हें ॥११॥तुका ह्मणे देव भक्तां साहाकारी । न सांगतां करी सर्व काज ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : July 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP