मध्यखंड - जीवनिर्धारनाम
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
अविद्या देह संयुक्त जीव मित्यभिधीयते ।
उपाधिरहितं नित्य शिवेति प्रोच्यते बुधै:॥१॥
आइक कथन देवकृत । केवळ शंकराचें मत । नोहे अप सिंध्दात । कोण्हाचें काहि ॥१॥
जीव शीव प्रणव ईश्वरु । याचा करु निर्धारु । जें बोलिला शंकरु । ते हे कथा ॥२॥
आतां जीव तो कवण । असें पाहिजे प्रमाण । जीव कळल्यावांचून । सुख कैचें ॥३॥
जीव कवणू असें कळे । तैं आत्मा हि निवळे । जीवाचा देठी मिळे । सर्व काहिं ॥४॥
जो प्रणव श्वासाचा मेळु । होउनि असे गुंडाळु । मागां सांगीतला केवळु । जीव असा ॥५।
जंवरी गुंडाळलें सूत । तंवीर गुंज निभ्रांत । ते विश्वासमेळें बोलिजात । जीव असा ॥६॥
सूत सरलयां काज । तेथ कैचिं उरे गुज । तेवि श्वासु सरला निज । जीवत्व नसे ॥७॥
प्राण जीवु असें । नोहे सांगीतले तैसें । जीवु नोहिजे हंसें । हें हि कळलें ॥८॥
जो संगीतला अष्टदळीं । तोही जीव नोहे कोण्हें काळीं । हा सूक्ष्म देहाचा मेळीं । असे आत्मा ॥९॥
देहत्रयाचे अभिमानी । यासी जीवपणें न गणीं । इह पर संधी स्थानि । हा ही न घडे ॥१०॥
जीवु समुदायें ये नेमा । ज्याचेंनि चळे तो जीवात्मा । यासी आधारु परमात्मा । नेमें असें ॥११॥
येक ह्मणती जीव मन । येकां आठउ प्रमाण । परी गा निर्धारा वाचून । विश्वासु नसे ॥१२॥
निर्धारें जीव घडे असा । जो चहुं देहाचा ठसा । यासी चिं आधिं सहसा । रुप करुं ॥१३॥
ज्यासी देहादि सर्वज्ञान । हेतु आठवाचें लक्षण । महब्रह्मीचें दुसरें पण । प्रत्यक्ष जेतें ॥१४॥
असें जे देहीं प्रमाण । ते देह महाकारण । याचें केलें लक्षण । वेदविदिं ॥१५॥
जे आपणा नाव वस्तु नेणें । जें मद वेष्टले अज्ञानें । विसरु विस्मृति लक्षणें । अभाव निद्रा ॥१६॥
असें जड सर्वनेण । देही उठती गुण । तें देह कारण । दूजे होन ॥१७॥
आतां लिंग देह दूजें । ते या परी आणिजे । जेथुनि उठती बीजें । देहेंद्रिंयाचीं ॥१८॥
अंत:करण निर्विकल्पनें । सर्व चाळावें मनें । बुध्दि निर्धारु बाणें । हें करणें लिंगदेहाचें ॥१९॥
चित्ता चेतव्य गुण । अहंकार अहंता स्फुरण । हें लिंगदेहचें गुण । देहिं उठती ॥२०॥
क्षुप्तिपासा प्राणें । व्दारें द्रवति अपानें । शब्दादि उदानें । कर्म कीजे ॥२१॥
नाडी शिरा चाळि समानु । अंगवेदना जाणे व्यानु । हे वायोचे गुण । लिंगदेही ॥२२॥
नादु आइकीजे श्रवणें । त्वचा स्पर्शातें जाणें । नेत्रिं देखोन निवडने । रम्यारम्य ॥२३॥
रसना जाणें स्वादु । घ्राणें घेणे गंधु । वाचे उठे शब्दु । नाना गुणी ॥२४॥
जेणे घेणें देणें हातीं । जेणे चरणासी गति । शीश्न जाणे रती । गुदीं मळकर्म ॥२५॥
पंचविषयाचि कळा । चळन इंद्रियां सकळां । तें लिंगदेह स्थूळ । कारण असे ॥२६॥
ज्याचें र्हदयस्थान । ज्याचें अष्टदळीं अधीष्ठान । ते लिंगदेह कारणें । तीसरें सूक्ष्म ॥२७॥
सांगों स्थूळसविस्तर । ज्याचें प्रमाण आउठ कर । ज्याचा ठाइं निरंतर । विकार साहि ॥२८॥
आतां काम क्रोध शोक मोह भय धावण । चळन आकोचन निरुंधन प्रसरण । क्षुध्दा तृषा निद्रा आलस्य जाण । कांति युक्त ॥२९॥
लाळ मूत्र स्वेद रक्त रेत । मेदा मज्जा अस्थिशिरायेत । एणेंसीं वर्त्तत । थूळ देह हें ॥३०॥
श्रोत्रादि इंद्रियें जाण । हे सर्व स्थूळाचे गुण । प्रत्यक्ष देखती नयन । ते सर्व स्थूळ ॥३१॥
शरीर येथीचें भूतळ । शोणित येथीचें जळ । हुताशुन सकळ । पचनु येथें ॥३२॥
पवन ते प्राण । आत्मा तें चि गगन । हें पंचभूताचे गुण । जड देहीं ॥३३॥
यां चौ देहा मिळौनि । अविद्या प्रकृति भर्वसेनि । हा चि जं वु बुधी जनी । ओळखावा ॥३४॥
सर्व वृक्षा मिळौन । समष्टिं बोलिजे वन । तेवी समुदाया पासुन । जीव होय ॥३५॥
सेना चातुरंग समुदायें । कां सर्व मेळे गाडाअ होयें । तेवी जीव शकट न्यायें । ओळखावा ॥३६॥
जन्म याचा संयोगु । मरण याचा वियोगु । असा जन्ममरण भोगु । अखंड जीवा ॥३७॥
जीव ब्रह्म चि निर्मळ । लाहे प्रपंचाचें बळ । इत्यादिक जे जे मळ । ते ते अविद्या ॥३८॥
जे जे भासे आकृति । ते जीवाचि प्रकृती । जीवा जीवन शीष्यमूर्ति । अहंकार आत्मा ॥३९॥
शुद्र सुनील ब्रह्मांडीचा । शद्रु विकारअ अहंतेचा । तो परमात्मा जीवाचा । साचु होय ॥४०॥
अवस्छा जीवाचे विकार । वाचा जीवाचे व्यापार । जै जे यासी वोरबार । ते ते ताप ॥४१॥
भोगषड् विकार केवळ । श्वासोश्वास याचें मूल । प्राणवायो सकळ। सूत्र याचें ॥४२॥
आहारु तो कारण तंतु । जे स्मरण तें चि हेतु । याचा स्वधर्मु साक्षांतु । ब्रह्म विषयो ॥४३॥
जो बीजाचा अकुंर । तो चि सविस्तर तरु । तेवि जीवाचा निर्धारु । रेतिं असे ॥४४॥
जो संशयो ते अवगति । जो जो निश्चयो ते ते गति । कामना संसृती । संशय़ हेतु ॥४५।
ब्रह्म विवर्जित मानी साचु । तो चि याचा प्रपंचु । देखे सर्वाचा वेचु । तो चि निर्धारु ॥४६॥
हा सर्वागें सहित जीवु । येकदेशी नये घेउं । येथ प्रमाण प्रत्यक्ष देउं । पाहे येक ॥४७॥
अंग खंडलया आन । दोहिं भागो सचेतन । तरी येकदेशी येकस्थान । कैसें याचे ॥४८॥
तरु खोड खाडी पल्लव । खंडलेया हि फुटे सर्व । तरी हे येकदेशी भाव । फळती कैसें ॥४९॥
खंडे नाशे देह सरे । तें आछादिलें ही जीवी भरे । तेथ येकदेशीं ये उत्तरें । सरती कैसी ॥५०॥
ह्मणौनि हा नव्हे येकदेशी । समुदायें नेमावें यासी । नाथपंथी रुद्रमती असी । गुहयें असती ॥५१॥
॥ इति जीव लक्षण ॥
====
जो ब्रह्मांड समुदावो । तो शिव अदि देवो । सर्व ही तेथीचा भावो । सांगितला तुज ॥५२॥
आदि खंडी दशमा कथनी । विराट हिरण्यगर्भु देहे दोन्हिं । हे विवंचना करुनि । सांगीतले तुज ॥५३॥
प्रथम भागाचें सार । देवतामय शरीर । ते हिरण्यगर्भ देह सविस्तर । तेथें चि कथीलें ॥५४॥
जे परस्परानुप्रवेश स्थूळ । जालें विराटदेह ढिशाळ । तें हि सांगीतलें सकळ । तो चि कथनी ॥५५॥
आणिक नवम कथनी । अहंकार दाविले निवडोनी । तें तिजे देह भर्वसेनि । होय जाण ॥५६॥
तें चि खंडी सप्तम कथन । केलें मायामहत्व निरुपण । ते देह महाकारण । सर्वेश्वराचें ॥५७॥
या देहाचौचा निर्धारु । तो चि शीव सर्वेश्वरु । इंद्रिय तत्वता विचारु । कळला तुज ॥५८॥
॥ इति शिवसर्वेश्वर स्वरुप ॥ऽऽ॥
====
जो मातृकाक्षरिं समुदावो । तो ऊँ कारु आदिदेवो । याचा सर्वही भावो । कळला तुज ॥५९॥
आदिखंडी अष्टम कथन । केलें याचें निरुपण । येणें समुदायें जाण झ। हे विश्वरुप देह ॥६०॥
चहु मात्राचें समुदायें । तें ऊँ कांरी च्यार्हि देहे । हे पूर्विची जालें आहे । ज्ञान तुज॥६१॥
जो या शिरीं बिंदु । तो प्रत्यक्ष समुदानंदु । यासी येथीचा नादु । जीव तंतु ॥६२॥
जो अहंता विकार ईश्वरीचा । तो चि परमात्मा येथीचा । हा समुदाय ऊँ काराचा । सांगितला तुज ॥६३॥
॥ इति ऊँ कार ॥ऽऽ॥
====
जो सचिदानंद साचारु । तो परमात्मा ईश्वरु । येथ जीवत्व अहंता भरु । येर तें नसे ॥६४॥
याचा परमात्मा हा चि बीज । हें पूर्वि सांगवले तुज । पुढां उत्तरखंडी सहज । हें चि बोलनें ॥६५॥
तेथ सर्वेपरी साचारु । आहे होईल हा निर्धारु । तरी येथें चि विस्तारु । आणू याचा ॥६६॥
॥ इति ईश्वरतनुनिर्धारु ॥
====
ब्रह्मापासुनि येथवरी । हें देखावें चातुरी । हा उपदेशु निर्धारी । श्रीशंकराचा ॥६७॥
नाथपंथी सीध्दांती । तेथ हि दाविलि वित्पत्ति निर्धारीं पशुपती । अनुवाद यातें ॥६८॥
शिष्यिआ बहुतें प्रयासें । गुरु हा उपदेशी असें । तें मिं बोलिलें मिशे । ग्रंथचेनि ॥६९॥
मित्र अबुध दीन मशक। अविद्या जनित जीव येक । हें बोलणें संतिक । कायसें मज ॥७०॥
जें सर्वाचें कारण । जेथुन विश्व उत्पन्न । तेथीचें वर्णिजे महिमान । हे चि मोटें ॥७१॥
जे योगां तपा दमना । तीर्था क्षेत्रां व्रतां दाना । शमदमादि साधना । हातां नये ॥७२॥
ज्यासी उदो कीजे दिनकरें । ना झांकवेना अंधकारें । ते कोण्हेंहि हिमकरें । शीतळ नव्हे ॥७३॥
तें न समाय नभांचां पोटी । न जीये प्राणांचा देठी । त्यासी महातेजाग्री कवटीं । असें नाही ॥७४॥
तें कदा हि न द्रवे आपें । न धरवे भूमिचे बापें । असें उच्च आपणापें । आपण चि तें ॥७५॥
जे भासा नये वित्पति । दर्शनें नेदिति हांतिं । ते कोण्हें देशांचा अंति । प्राप्त नव्हे ॥७६॥
तें अहंता बळे नातुडे । नेदिति संताची झाडें । ते बाह्याभ्यंतर चहुंकडे । सर्व दाटले ॥७७॥
येवढी वस्तु अगाध । हें बोलिजे एवंविध । याचें हि ध्यान शुध्द । घडों पाहे ॥७८॥
एवढा रचिजे प्रबंधु । असा काय समर्थ वादु । परि काय करुं विश्वकंदु । प्रसन्न जाला ॥७९॥
तेणें कृपावत्सलें । गुह्यें दीधली सकळें । पूर्ण दाउनि डोले । भरीलें माझें ॥८०॥
त्या ज्ञानाचें आधारें । माझी वैखरी विवरे । यास्तव ये उत्तरें । सगर्भे होती ॥८१॥
वरी चंडिकेचे महिमान । वाचे संचरे आपण । यास्तव हें वचन । प्रौढ जालें ॥८२॥
त्या उभयांचेनि वरदें । मिं बोलतसे आनंदे । यास्तव ये पदें । सुरसें होति ॥८३॥
असो हें देवें सर्वेश्वरें । या देहाचेनि आधारें । आपुलें सुख बा रे । आपण भोगी ॥८४॥
जे विश्वमुख पाहावया । प्रतिबिंब ये न्याया । किं तरु आपुली छाया । आपण करी ॥८५॥
अथवा तळीं मेदिनीं । घनरुपें संचरे गगनी । आपणा वरी वर्षोनी । आपण निवे ॥८६॥
तेवी आपली कीर्त्ति आपण । भोगी दावि दुजेपण । यास्तव दूषण का भूषण । नाहि यांसी ॥८७॥
परीं हे जाणावयालागी । अनंत उपाय उठलें जगीं । ते हे तुझीये आंगी । रोकडे बैसे ॥८८॥
जें दर्शना न फुटे गुज। हें सद्य चि दीधलें तुज। हा उपदेशु सबीज । श्रीशंकराचा ॥८९॥
जीव शीव उपयथा । मिं युक्तिचा नव्हे वक्ता । हें सत्य प्रसन्नता । उभे हराची ॥९०॥
ते हे भैरवाचे आत्मजे । बोलिजे त्रिंबक व्दिजे । ये श्रोते हो पदे सबीजे । सादरें घ्यावी ॥९१॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्म सिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे जीवनिर्धारनाम चतुर्द्दश कथन मिति ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP