मध्यखंड - सर्वोपाधिडंबरनिरसन

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


अकारणं तु यत्सर्व मिथ्या भावा भ्रमोदिता: ।
कारणेन विना मोक्षो मृगतृष्णांबु लभ्यते ॥१॥
तव बोले श्रीगुरु । शीष्या तुज असें करुं झ। ये उपाधीचा डंबरु । सर्व निरसु ॥१॥
या प्रपंचाचेनि अनुवादें । सुखें तोष आनंदे । परी तुं ब्रह्मानंदे । सुखी होई ॥२॥
प्रकाशु जालिया सदा । तो निरसेना कदा । तुं तुझ्या आनंदा । पात्र होय ॥३॥
सूर्यासारिखें तेजीष्ट । परतापन उत्कृष्ट । परी तें स्वयं देहा दुष्ट । होउ नेणें ॥४॥
महानदीचि कीडाळें । हारपती समुद्रजळे । परी समुद्रा समुद्रु कोण्हें वेळें । गिळुं न शके ॥५॥
तेवी यें सर्वमतें । निरसी उपाधीचे हातें । पाठीं स्वयंप्रकाशु तुझा तुतें । शाश्वतु होईल ॥६॥
अपुरी उपाधी न साहे । कां जे ते पूर्वापर पूर्ण आहे । यास्तव तुं सहजीं राहे । चळों नको ॥७॥
धरुनि उपाधीचा हातु । भेदु मानू नित्यवंतु । तै प्रत्यक्ष ब्रह्मघातु । आह्मी च केला ॥८॥
हे उपाधी आणू रसी । वस्तु नेमुं अन्य देशी । तै श्री सिध्देशें ज्ञानराशी । लाजविला तो ॥९॥
सहज पूर्ण ते अभेदु । हें विभांडून कीजे बहुतविध । यासी प्रायश्चीत प्रसीध । कोठें पाहे ॥१०॥
निर्धारें हें ची टाळीं । सीध्द तें न विटे कोण्हे काळी । उपाधी उपाधातें गीळीं । हे तो दीसे ॥११॥
॥ इति पूर्णप्रतिपादन ॥ऽऽ॥
====
आइक अनित्यें असत्य स्थळें । जें निरर्थकें निर्मूळें । तें संवादि रसाळें । अबुधें जनें ॥१२॥
अस्ति मवाळ ना रसाळी । पशु स्वलाळा चघळी । तेवी निमुळें टवाळी । शोचिती मूढ ॥१३॥
अंडजें स्वेदजें उत्बिजें । ये बोलो नेणति सहजें । मनुष्या वाचुनि जारजें । ते हि तैसी ॥१४॥
जे आपुलि हि जाती नेणती । ते कथा गोष्टी अनुवादिती । याचे श्रोते वक्ते आहाती । मंद अथ बुध ॥१५॥
काष्टा पाषाणा वाचा । मां पाडु का आणिकाचा । असा ही संवादु येकाचा । आईकुं आह्मिं ॥१६॥
घेती बोलाचा ओडंबरु । त्यासी प्रमाण ना आधारु । जैसा नटाचा श्रृंगारु । सगर्भु नोहे ॥१७॥
गतक गोष्टी मृत्यु कथा । प्रत्यक्ष नव्हे सर्वथा । मां सांगतां आइकता व्यथा । कोणते हरे ॥१८॥
जैसा गारुडा खेळु । दीसे साचु परी वोफळु । वाय शब्दाचा मेळु । तैसा असे ॥१९॥
ऊँ डंबरिचा दिठिवां । असानु परि दिसे बरवा । वावो गोष्टीचा जीवा । विश्वासु तैसा ॥२०॥
आत्मरहित पुराणें । आणि बाह्यशास्त्रें प्रमाणें । ये ढांडोळिता मनें । आसुळ होईजे ॥२१॥
तरी गा स्वधर्मि असावें । पूर्ण तें वोढोनि ध्यावें । फापारुं नये हेवें । पुढीलाचेंनि ॥२२॥
जो चुके स्वधर्मपाहाटे । चाले दर्शनाचे वाटे । तर्‍हिं हिं संशयाचें खरोटें । झाडावें चि तो ॥२३॥
जो आपुली कुळभूमि सांडी । निघे दर्शनाचे दरडी । तर्‍हिं हिं आत्मतत्वाचें थडी । मिठी घालावी ॥२४॥
जयासी हें असें न घडे । तो तो दोही परी नाडे । सीध्द गृहस्थधर्म न घडे । योगु हि भ्रंशे ॥२५॥
॥ इति भेदमत ॥ऽऽ॥
====
जीव प्रपंचौ देवता आन । यासी ईश्वरु असे भीन्न । ये नित्य असें वचन । स्थापिलें तेहीं ॥२६॥
जरी हा भेदु प्रमाण । तरी यासी मूळ ते कवण । हें प्रबुधाचें नित्य समान । परस्परें असे ॥२७॥
ते ईश्वरीं सदा भिन्न । या लागी भक्तिधर्मु अप्रमाण । प्रबुधाचें लोचन । देखती असें ॥२८॥
जो सच्चिदानंदपर । तें तो प्रत्यक्ष निराकार । तेथ घेती अवतार । आपाइते ॥२९॥
चैतन्यापर तो देहमुर्त्ति । त्याचा माग मोडी धावती । तत्व रहित ते ह्मणती । पंच अवतार देव ॥३०॥
लीळा चरीत्र सामर्थ्यें सर्व । असें वर्त्तती ते देव । हें ह्मणों तरी दानव । कोणें सामर्थ्ये उणें ॥३१॥
लीळा पीशाचे का बाळे । ऋषी चरीत्रें आगळे । ऐणें बोले नाडळे । पूर्ण देवपणेंपण तें ॥३२॥
मूलामा काखे घालुनि नरीं । चोरुनि विकावा घरोघरी । तेणें अभोळ नरनारीं । नाडती चि तो ॥३३॥
ते आणू नये चोहटां । दूषण पावे नानवटा । असें या मतां कपटा । घेउं नये ॥३४॥
कांनफुकीचिं उत्तरें । तें आहाचें असारें । कां पूर्ण ब्रह्म तें अपुरें । असें नव्हे ॥३५॥
बोलीजे हळुवा गोष्टी । कां यकांति देविजे दृष्टी । तेणे प्रपंचीकु संतुष्टी । प्रबुधा सीणु ॥३६॥
॥ इति भटमार्गु ॥ऽऽ॥
====
ताल राग स्वव्र तंतु । येथेची हेतु । हे शुध्दसार परंतु । बोलु नसे ॥३७॥
हा चि पंचमा वेदु ह्मणौनि । संतोषती रागज्ञानी । तरी हें सामगा वाचूनी । दुजें नसे ॥३८॥
या परीचें नवरस । तें आत्मरसीं विरस । कां जे कोण्हें हीं रसें स्वप्रकाश । न सधे वस्तु ॥३९॥
नादु चि परवस्तु मानीजे । तरी तो नादु कोठो न उपजे । हें बारें न घलीजे । प्रबुधां आंगी ॥४०॥
॥ इति नादराग ॥
====
एक डांबिक प्राणिं । आपण वंद्य होउनी । ते फुंडती मनी । भाते जैसें ॥४१॥
वाचासीध्दिचेंनि बळे । सेवे बोडिती आभोळें । तरी हें त्याचें त्यासी न फळे । अन्यत्रा काई ॥४२॥
तरी गा आशाबध्द सैराट । तेथे लागती लागट । जैसें भगवयाचें सुनाट । भगवें गीवसी ॥४३॥
ना ना जैसें धातुवादि । धावे धातुचां वेधी । तेवी प्राणि मंदबुध्दी । पाहाती यातें ॥४४॥
सुवर्ण पंथीचे नाते । साचापरी मानूं येतें । बोहरुपीयाचें सीध्दांते । सीध्दी साधती ॥४५॥
वोडंबरीचा दीठिवां । किं गारुडाचा यावा । वाधीकडाचा नाडावा । नाडे तेवी ॥४६॥
असें नाडीति जना । ते नाणावे प्रमाणा । या माजी ब्रह्मज्ञाना । कोण येती ॥४७॥
पाहा पां अविद्येचेनि मते । मेलीं मारिलीं भूतें । तें करुनी देवतें । पूजिताति ॥४८॥
मनी मन संचारें । आसनी घुमे घुमारे । हे खुण घुमारे जाणे दूसरे । वेधे यासीं ॥४९॥
हे होणार ते होत । फळलें तैसा च दैवत । न फळे तैं आणित । कर्मावरी ॥५०॥
तैसी चि प्रतिमा देवतें । रुपें घडोनि यथोचितें । प्रतिष्ठा करुनि त्यातें । पूजिजे प्रेमें ॥५१॥
तेथ आपुला चि भाव । फळे तो फळला देव । न फळे तै डावो । दैवावरी ॥५२॥
या चि परी व्रत नेमु वोवसे । पूर्व कथा श्रवण रसें । न कळे तर्‍हि सायासें । आचरे जन ॥५३॥
तेणें वनें तीर्थें क्षेत्रें । हेवे चि कीजती सर्वत्रें । प्रत्यक्ष कोणाची गात्रें । पवित्रें जाली ॥५४॥
याही होनि समर्थ । बोले चि आणिति पदार्थ । परी अपूरें आहाच व्यर्थ । घेउं नये ॥५५॥
एकादशी साकार । तेहिं नेघावें साचार । यवनमतिचे निराकार । हे ही नको ॥५६॥
सर्व दिशा सांडोन । जयासी प्रतिची प्रमाण । तया पूर्ण निरुपण । कैचे बापा ॥५७॥
तरी गा भेदाचा टीका । तो येथें चि लागला निका । विरोधु भेदु या लोकां । मध्यें चि वसे ॥५८॥
प्रत्यक्ष नसधे निराकार । ह्मणसी घेउं साकार । तरी गा दुरोनि च डोंगर । शोभिवंत ॥५९॥
प्रत्यक्ष पाहे साकार । भक्तसृष्टी अपार । या माजी कोणाचें शरीर । उपमलें दीसें ॥६०॥
तरी या पूर्विला गोष्टी । आपण आइकुनी संतुष्टी । परी कोणा कहि संकष्टी । सद्य नये ॥६१॥
प्रत्यक्ष नव्हे कव्हणा । तरी ह्मणती भावो नाहि मना । कां जन्म संस्कार विवंचना । हे चि करीति ॥६२॥
कां ह्मणती युगमहिमा । कां डाव आणिति पूर्वकर्मा । नां तरी करणी आचरण धर्मा । चुकी पडली ॥६३॥
तरि बाळ वार्ध्दक्यापासून । भक्ति धर्म दान दमन । हें सर्वही भावहीन । कैसें जाले ॥६४॥
यास्तव अपूरीं दिनें । ते नेघावी सुजाणे । जें पूर्ण विषई प्रमाणें । येति तें साचें ॥६५॥
साच चि येक देखोनि परा । आचरति नेमा आचारा । परी मना आणि निर्धारा । गांठी नाहि ॥६६॥
जो ब्रह्म वस्तुचा लाभु देखे । तो कर्मोद्यमु करी सुखे । न बुडतु जन्मदुखें । ब्रह्म होय ॥६७॥
जो सार ते स्वप्री नेणें । कर्म करी अभिमानें । तो न चुके जन्ममरणें । कोण्हे काळीं ॥६८॥
कर्म केधवां न संडावें । समूळ फळ त्यजावें । अभीमानें न पडावें । कर्त्तव्याचें ॥६९॥
आत्मा नातुडे घरीं । लाभे अन्य देशांतरीं । असी आहाच अपूरीं । वस्तु नव्हे ॥७०॥
आणि कुटंबे देहिचि देव्हडी । देही करीति तडातोडी । तें दुष्टे घे आवडी । महा मोघु ॥७१॥
यास्तव जे अंतरल्यागु । या नाव राजयोगु । येणें बाहिरिल संयोगु । मोक्ष रुप ॥७२॥
॥ इति निर्धारु ॥ऽऽ॥
====
उपाधी कोठें न मिळे । तैं जावें दर्शना जवळें । डंब प्रपंचाचें फळें । ते तेथे चि लागे ॥७३॥
पैल दर्शन पाशुपती । तें शिवातेंची मानीति । वरी मंत्र जपति । षडाक्षरीं ॥७४॥
तया लिंगो धारण । ह्मणति तरलों आपण । तैसें चि चार्वाक दर्शन । भेंदी असे ॥७५॥
जेथ मुख्य उहापुह । तें कैसें नि:संदेह । येक ह्मणती देह । हें चि कारण ॥७६॥
तरी शरीर मात्र अनित्य । हें केवी होईल सत्य । एक ह्मणती नित्य । मूळ प्रकृति ॥७७॥
आत्म परीणाम जेथ । माया कोण देखे तेथ । प्रकृति निंद्य त्या शून्य वादातें । स्पर्शु नये ॥७८॥
ह्मणती शून्याचें सकळ । या वेगळे जगडाळ । येथ भदाचें बळ । विशेषे देखे ॥७९॥
जेथ भोंक तेथ ढोंक । हे गुह्य मानीति येक । परी परमार्थ विषई संतिक । हें ज्ञान नव्हे ॥८०॥
॥ इति दर्शन ॥ऽऽ॥
====
बुध्दी आत्मा आंतुडे । येक हे चि घेति कोडें । तें ही नव गुणेंसी पुढें । सांगों आतां ॥८१॥
श्रृत दुष्ट अनुमानें । जो निर्धारु ते बुध्दीचीं लक्षणें । ये बुध्दी पासाव प्रेत्नें । उठीजे तेथें ॥८२॥
ते साधनी ईछा व्देषु अंकुरें । ईछा व्देषीं सुखदु:ख संचरे । सुखा दु:खाचें आधारें । पुण्य पाप ॥८३॥
पुण्य पापापासुनी । संस्कार पावे प्राणी । असी येकयेकापासूनी । वृध्दी होय ॥८४॥
असे बुध्द्यादि नवगुण । हें संसृतीसी कारण । एवं याते विव्दज्जन । आरुतें देखती ॥८५॥
॥ इति बुध्यादि नवगुणा ॥ऽऽ॥
====
जैन जीव दया प्रतिपाळन । वरी केशाचें लंचन । तर्‍हिं पूर्ण प्रकाश ज्ञान । न देखो येथें ॥८६॥
या चि परी कपाळी । ते शरीर कर्में बळी । भक्षाभक्ष दुफळी । नसे तयां ॥८७॥
श्रवण छेदक योगीजन । सर्व ज्ञाती भीक्षाटण । ज्यासी श्वासाक्षर प्रमाण । प्रणवें सहीत ॥८८॥
आदिनाथ आदिमाया । तमाळ घर गुह्य तया । आदि अनिळ तो कार्या । कर्त्ता पुरुषु ॥८९॥
पूर्णाक्षर दोनि पदें । ते हि मानिलीं प्रसीध्दें । साही गुह्यें एवं विधें । मानिली तेहीं ॥९०॥
वरी सोहं बीज प्रमाण । जन्म नदेखती आन । यास्तव रक्षण । देहाचें करिती ॥९१॥
परी गा प्रबुधाचें विचारें । हें येवढें हि दिसे अपुरें । कां जे परब्रह्म पुढारें । समर्थ आहे ॥९२॥
॥ इति मार्ग गुह्य ॥ऽऽ॥
====
एक ग्रामस्थ एक वनी । येक दृढ आसनी । येकांचे आचरणी । भवरे पडले ॥९३॥
येक साधकाचें सिधिं । आदिकरुन समाधी । दाविति नाना विधि । करामति ॥९४॥
येक अगोचरीचेनि कोडें । लोक भोंदिति बापुडें । हें विस्तारुनि उघडे । घालूं नये ॥९५॥
असो ठाइहुनि प्रसिध्द । कर्मिष्ठां भेद चतुर्विध । तें आइक प्रसिध्द । पूर्विहुनि ॥९६॥
शैव आणि शांभव । स्मार्त आणि वैष्णव । याचें आचारभाव । भिन्न भिन्न ॥९७॥
वाचा श्रवणी दृष्टी । नावडे विष्णु च गोष्टी । शिव नामें संतुष्टी । ते शैव ॥९८॥
शिव लिंग उपासक । शीव मंत्र वाचक । तयासी शिवा वाचुन आणिक । दैवत न मनें ॥९९॥
या चि परि वैष्णव । मेलियां हि न ह्मणति शिव शिव । विष्णु वाचून सर्वं । न मनिति ते ॥१००॥
तैसें चि गा शक्ति । केवळ शक्तिचे भक्त । शक्ति वाचुन अयुक्त । सर्व तयां ॥१॥
आइक स्यार्त आचार । ते सर्वाचे भक्ति सादर । हरिहरादि सुरवर । वंदिति ते ॥२॥
असें चतुर्विध जन । नव्हे अभेंदी प्रमाण । सर्वे प्रकारीं पूर्ण । हारविलें तेहिं ॥३॥
वेदगर्भदर्शन मत । जें पठन तें चि हित । पठनें चि साक्षांत । मोक्ष प्राप्ति ॥४॥
परि गा वेदाचें पूर्ण ज्ञान । ते वस्तु विषईं कारण । येर सर्व ही ज्ञान । संशय रुप ॥५॥
नैय्यायिक दर्शन । तया कर्तव्य प्रमाण । सहज वस्तुचे स्वप्र । नसे तया ॥६॥
मिमांसा उपाधिक । हें हि संशय बाधक । भेद बुधी सार्थक । कोण्हांचें नव्हे ॥७॥
ब्रह्म ज्ञान नव्हतां । कां ब्रह्मार्पण न करीतां । कां निराश बुधी न भजतां । कर्म जे जे ॥८॥
ते ते सर्वही जड । धाय संशयाचें तोंड । संसार तरुचे पेड । पोषे येणें ॥९॥
स्वधा स्वाहा हव्य कव्य । कर्म सव्य अपसव्य । केलें तर्‍हिं नव्हे सेव्य । ईश्वरें विण ॥१०॥
कर्में नित्यें नैमित्यें । श्रोतें स्मार्तें सत्यें । परी जे ज्ञान अंधे तें अनित्यें । भर्वसेनि ॥११॥
जें आपण आचरीजे कोडें । तें ना ह्मणौनि निघे पुढें । तैं उपाधीचें विरुढें । नुगवे कैसें ॥१२॥
पुराण प्रामाणिका जना । भेदु चि ये प्रमाणा । त्याची अभेदीं वाचना । उठे कैसी ॥१३॥
शब्दापशब्द चें भरी । जे पडले आजन्म वरी । ते विश्रांतिचे घरी । येति कैसें ॥१४॥
जे जन्म पर्यंत भेद सागरीं । डहुळत राहिले माझारी । ते पूर्णतेचा तींरी । सुखावती कैचें ॥१५॥
येक शब्दातें राखोन । करीति पराचे छळन । तया बापुडीयाचें ज्ञान । चर्मवेधक ॥१६॥
सांडोन सर्वागा सकळा । क्षत पाहे काउळा । मासिचाहि जीवाळा । ते चि ठाईं ॥१७॥
असो हे ब्रह्मचारी वानप्रस्थ । हे भेद स्छाई स्वस्थ । निवडने व्यस्ताव्यास्त । हे दशा त्याची ॥१८॥
जे कर्माची पूर्ण दशा । ज्याचेंनि रुपा यें मिमांसा । तो शुध्द सचिळ जैसा । चिदादित्य ॥१९॥
तत्वमस्यादि वचनें । महावाक्यें प्रमाणें । तें उठविति ठाणें । माये अविद्येचें ॥२०॥
माया अविद्या मूळीं देखे । त्याचां निराशीं तोषे । सांडी मांडिचे सुखे । सुखातें पावे ॥२१॥
एकदंडी व्दिदंडी त्रिदंडी । हंस दीक्षा येवढी । सहसा संशयाचां सांकडी । नांदणे याचे ॥२२॥
पुढां वेदांत दर्शन । हे सर्वा कारण । जेथ होय विध्वंसन । सर्व मतां ॥२३॥
जेणें चुके लोकोपवादु । निरसे संसार बंधु । असा डाउका प्रबुधु । असावा कीं ॥२४॥
बीज अकुंरु न मोडी । देखें फळाची गोडी । अवघेची संसार झाडीं । क्रीडा करी ॥२५॥
जें येकविध अपुरें । तें निरसूनि टाकावें बा रे । हें चि वर्म सोपारें । आत्मसीध्दी ॥२६॥
सिध्दिसाधीचिया दशा । या आत्म विषइ वायसा । जें जें कल्पिजे तो तो फांसा । दृढ होय ॥२७॥
प्रत्यक्ष आत्म पुरुषा । नसे दुसरी भाषा । या प्रकृति अशेषा । या चि मध्यें ॥२८॥
उपाधीचा डागु साहे । परी तुं सीध्द स्वरुपीं राहे । हें चि वर्म आहे । श्रीसिध्देशाचे ॥२९॥
यास्तव सहजा परुतें । खण नाहीं निरुतें । सर्वही जोडे आइते । तीमा ह्मणे ॥३०॥
इतिश्री चिदादित्य प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे सर्वोपाधिडंबरनिरसन नाम त्रयोदशकथन मिति ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP