मध्यखंड - जीवाचें लक्षण
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
क्षणप्रबोधे विश्रांता न विश्रांता: परे पदे ।
नाभ्यासेन विना बोधो येषां याति मनो हृदि ॥१॥
पाहातां शरीर निर्मळ । यासी जाणावें समूळ । येथीचा अभ्यासु सकळ । कीजे तो भला ॥१॥
येथ क्षण येक चित्त । जरी राहे निश्चंत । तैं परम पदा हि अतीत । विश्रांती होय ॥२॥
कां जे परब्रह्म तें निर्गुण । तेथ नसे ध्येय ध्यान धारण । यास्तव या माजि मन । घालूनी पाहावे ॥३॥
यास्तव याचा विचारु ।ये खंडी समूळ करुं । आतां अजज्पा जीवाचा निर्धारु । बोलों ये कथनी ॥४॥
देही जीवु तो वर्तुळ । प्राणापानी दे उदालु । येणें चाले सकळु । अजपाजपु ॥५॥
चेंडु हातीं ना भुई ।तैसा जीव भवें देहि । हं सं हं सं या दोहिं । अक्षरीं चाले ॥६॥
हृदईं असे प्राणु । गुद मंडळी अपानु । या दोहीतें लक्षुन । भ्रमे जीव ॥७॥
हृदई जीवु संचरे । तेथ प्रगटिजे हंकारे । ब्रह्मदेव आकारे । शीवरुपी ॥८॥
जीव स्वाधीष्ठानी आपटे । तेथ सकारें प्रगटे । हा शक्तिरुप घटॆ । अविद्याकारु ॥९॥
जें जीवाचें भ्रमण । तें ची श्वासाचें प्रमाण । हें जाणिजे लक्षण । प्राण जपाचें ॥१०॥
जीवु उपाधी रहितु भवे । तेणे जपु उद्भवे । ह्मणौन अजपा ह्मणावे । प्रबुध्दि यासीं ॥११॥
जीवा शीवा अक्यता । जपु हा दोहींचि समता । जीव शीवा उभयता । एकत्वें चालें ॥१२॥
॥ इति जीवाचें लक्षण ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP