मध्यखंड - शंकरस्तुति

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


वरद जालयां भवानी । नमस्कारुं पिनाकपाणि । महद्भूतांचि योनि । पंचवदनु तो ॥५०॥
या देवातें भावे । स्मरे तो वोलला दैवे । सर्व ही पुरुषार्थु पावे । इच्छापेक्षित ॥५१॥
एरें देवतें बापुडीं । नाही उदार्यता एवढी । तें तोंडे पसरुनि देवढी । खावों चि ह्मणति ॥५२॥
तें क्षोभू जाणति सर्वथा । पण नसे प्रसन्नतेचि कथा । हें मूळीं होनि विश्वनाथा । साहे चि ना ॥५३॥
भक्ता वेचिली सृष्टी । आपण सेविली मसणोटी । गळा न घली येरी गाठी । वांचुनि मुंडे ॥५४॥
वेचिली वस्तु पाहो नेणें । केली सर्पाची भूषणें । वस्त्रें सांडोनि परीधाने । चर्में घेतलीं ॥५५।
ऐसें असो अविद्यात्मक । यासी न भजती भावपूर्वक । असो त्यांचे कौतुक । आपलें चि सोसुं ॥५६॥
॥ इति शंकरस्तुति ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP