मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| अभ्यास योगो मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - अभ्यास योगो सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी अभ्यास योगो Translation - भाषांतर नाभ्यासेन विना ज्ञाने शिवेविश्रांतिवानसि । आभ्यासेन तु कालेन भृशं विश्रांतिमिष्यसि ॥१॥आइक अभ्यासाचें लक्षण । यमा नियमातें रक्षू । पाठीं आरंभिजे साधन । षडांगाचे ॥१॥कर्मभूमि शुचि स्थान । शुचि देश शुचिवन । एकांत स्थळ पाहोन । आरंभीजे योगु ॥२॥बरवी भूमि शोधीजे । मृतिका गाळूनि मवाळ कीजे । दर्भ पसरुनि घालिजे । शुध्द चर्म ॥३॥दृष्टी न फांके केउती । श्रवणी न पडे श्रृति । असें कीजे निगुती । अडकूर स्थळ ॥४॥जैसा दीपु निर्वातस्थानी । तैसें मनातें रक्षूनि । प्रवर्तावें साधनी । सिध्द पुरुषीं ॥५॥परी गा येक येकें साधी । सा सां मासाची अवघी । एवं तिं संवत्सरी सिध्दि । पावे हा षडांगु ॥६॥तिं संवत्सरि न घडे । तैं कल्पांति हि नातुडे । साधी कर्म अगडे । असें आलें ॥७॥प्रथम आसनाचें काज । हा हि बोधु करुं तुज । जेणें अभ्यासें ऋज । नाशु पावती ॥८॥बहुतां सिध्दाचि वचनें । पूर्ण चौर्यासी आसने । परि बालिलें त्रिलोचनें । चतुराशीति लक्ष ॥९॥समस्त ही जीवयाति । आपुलालां आसनें वर्त्तती । हे शंभु चि जाणे वित्पत्ति । गोरक्ष ह्मणे ॥१०॥ऐसी आसनें अनकें । कांही आभ्यासावि साधकें । परि ध्यान कार्या अलोलिकें । दोनि चि असती ॥११॥मूळबंधासी कारण । सुगमसार सिध्दासन । वज्रासन प्रमाण । ध्यानविषयीं ॥१२॥सांगो आसनाचें ज्ञान । तरि यव्दिषई बहुत प्रविण । विस्तारु दावावया कारण । कांहि चि नसे ॥१३॥॥ इति आसन॥====गुदि अधमुख अपान । हृदयीं ऊर्ध्दमुख प्राण । ये दोन्ही विमुख ह्मणौन भ्रमे जीव ॥१४॥ते अपानी प्राणु आणिजे । प्राणी अपानु होमिजे । या नाव बोलिजे । प्राण नियमु ॥१५॥एवं उर्ध्द कीजे अपान । तळा आणिजे प्राण । मध्यें बोलिजे उदान । कंठिहोनि ॥१६॥नाभिदेशिचा समानु पांचवां सर्वागीचा व्यानु । असें एकत्र करुनु । रक्षावे प्राण ॥१७॥प्राणा केलीया स्वाधीन । राहे जीवांचे भ्रमण । आणिक हि याचें कारण । बहुत असे ॥१८॥सूर्य भरुनि पूरकु । मध्यें धरावा कुंभकु । तैसा चि चंद्रि रेचकु । रेचावा निका ॥१९॥असें चि व्यस्त प्रकारें । हें तिन्हि चालवे निर्धारें । सर्वागी संपूर्ण भरे । त्राहाटकु तो ॥२०॥॥ इति प्राणायाम ॥====स्वाधीन जालया प्राण । वश्य करावें मन । पाठीं प्रत्याहारण । होतिचे होय ॥२१॥अंतर्निष्ट होय मन । हे चि विषया उन्मलन । पाठिं इंद्रिया मरण । दूजे नाहि ॥२२॥तेव्हां कटुर मधुर स्वाद । रसना नेणें भेदु । सुगंधु कां दुर्गधु । घ्राणा नेणे ॥२३॥रम्यारंम्य ये दोन्ही । निवाड नव्हे नयनी । निंदा स्तुती श्रवणी । तुल्य घेणे ॥२४॥उष्ण शीत दुर्गंधी चंदन । त्वचा मानी समान । घर आणि स्मशान । सारिखें तया ॥२५॥असें तो न बोध दु:कृतें । ना न तरे सुकृतें । प्रत्याहारें कृत्याकृत्ये । बाधेना तो ॥२६॥॥ इति प्रत्याहार ॥====पाठीं प्रतीति प्रमाण । आरंभिजे धारण । जे अत्यंत कारण । सर्व कर्मा ॥२७॥महीतत्व चतु:कोण । कठीण मुद्रा पीतवर्ण । ब्रह्मा देव कारण । ‘लं ’ कार बीज ॥२८॥मनें प्राणें हे भुवन । हृदयीं केल्या धारण । तैं होय स्तंभन । देह गात्रीं ॥२९॥अध इंदु निर्मळ । तें आप तत्व धवळ । विष्णुदेव केवळ । ‘वं’ कार बीज ॥३०॥तें कंठी जालया धारण । न नाशु पन्नगेविषे जारण । निवारे जरा मरण । कोमळ तनु दावी ॥३१॥तत्व नेमु हुताशन । प्रवाळ तेज त्रिकोण । अधी देव त्रिलोचन । रंकार बीज ॥३२॥ते मना पवनाचा मेळीं । आणुनि रक्षिजे ताळमूळिं । देह गात्रां चोखाळीं । पीडा हरी ॥३३॥वायु तत्व देव ईश्वरु । सुनीळवर्ण बीज ‘यं’ करु । भ्रूं मध्यें रक्षीतां थूळ भारु । सांडी आपुला ॥३४॥देवत सदाशीव उत्तम । ‘हं ’ कारबीजेंसी व्योम । हें ब्रह्मरंध्री नियम । करुनि रक्षणें ॥३५॥येणें पूर्णता आंतुडे । सर्व मोक्षु हा चि घडे । एवं धारणे दृढें । साधनी कीजे ॥३६॥स्तंभिनी द्रविनी दहनी । भ्रमणी आणि शौषिणी । ये धारणे धरुनि ध्यानि । प्रवर्त्तावे ॥३७॥॥ इति धारणा ॥====आतां ध्यानाचि शुध्दि । बंधयत्र देणें आधिं । पाठि होय सीधी । साधनें चि ॥३८॥टांचा दाटोनि वेंगी । निरोधु कीजे गुदलिंगीं । आधारु दाटे उर्ध्द मार्गीं । उठे शक्ति ॥३९॥ते कुंडलनीचे धुं धुं वाटे । देहिचें रक्त मांस आटे । पवनु घालि वाटे । ब्रह्मांडाचे ॥४०॥ते सर्व गात्रातें चोखाळी । अंत्र भेद रक्त गीळी । त्वचा आंगाते वेटाळी । एर सर्व आटवी ॥४१॥ते जालया उर्ध्द वदनी । होय शरीरा धूनी । असी असे करणी । मूळबंधाची ॥४२॥पाठी बंधू वोडीयान । दृढ करावें वज्रासन । पृष्टी पाणि फीर उन । पादांगुष्ठ धरावे ॥४३॥उदर नेटे पाठी । पडे पांसोळीयां कपाटी । योनि कंदातें दाटी । शोषी आंतें ॥४४॥तो नाडी शीरातें कवळी । समान उर्वरीतु पीळी । लिंग देहातें आकळी । पूर्व अष्टदळेंसहित ॥४५॥जाळांधरु बंधुपाठी । वज्रासनांचि गाठी । कीजे आकोचन कंठी । खिळे सुषुम्णातें ॥४६॥छेदनें इहनें लंबिका । लांब उनि लाविजे मयंका । तेव्हां रुची साधकां । साधती असा ॥४७॥क्षार कटू आम्ल तीक्ष्ण । गुड घृत मधु पय या समान । नवम ऋचा नवाळी तें गहन । अमृताची ॥४८॥चंद्रिची शुद्ध सत्रावीं । ते रसनाग्रें जै दूहवी । तैं फळी मांडावी । काळ रुद्रेंसी ॥४९॥आणि जरा दु:ख टाळोनु । दीसे कोमळ सुलळित तनु । तेथ मृत्याची कवनु । वार्ता आइके ॥५०॥तो आयुष्याचे गाठी । बांधे कल्पाचीया कोटी । रुद्र प्रळय ही दीठी । पाहों ह्मणे ॥५१॥ब्रह्मांडी वीय इंदु । तया ही नव्हे छॆदु । कामिनीसी संमंधु । जालयां हि ॥५२॥॥इतिबंधत्रय ॥====आतां ध्यानाची लक्षण । अंतर्लक्षि लाविजे मन । बाहय चक्षु निरक्षण । नासीकाम ॥५३॥हा योगु स्वत्सीधु । परी गा लक्षीचा विनोदु । आधारापासून चक्रभेदु । होय येणे ॥५४॥पवन उध्दाटे मन । उठे चक्राचे ठाणें । उर्ध्द मार्गें गमनें । भेदावीं चक्रें ॥५५॥प्रथम आधारु भुवन । गणेशु देवता ताम्रवर्ण । च्यारि पत्रें प्रमाण । सासें जपु ॥५६॥तें मनें आणि पवनें । भेदुनि उठवावें ठाणें । या नंतरें जाणें । षट्दळासी ॥५७॥तें सीं बीजेंसी स्वाधीष्टान । ब्रह्मादेव हेमवर्ण । षट् षट् मात्रुका प्रमाण । सा सहस्र जपु ॥५८॥ते हीं मनें मारुतें । भेदुन येती वरुतें । कुंडलनी लोटोनि घातें । मणिपुरा येती ॥५९॥जे विष्णु भुवन दिग्दळ । दशमात्रा शुध्द सुनिळ । सा सहस्र अनिळ । जपु तेथे ॥६०॥तें पवनारुढ मनषडें । पाडिती दशदळीचि दुर्गें । तर्हीं चालती पश्चिममार्गें । योगीश्वर ते ॥६१॥रीगोनि अष्टदळाचें पोटीं । घेरीं घालिति चौसटी । देउनि लिंग देहा मिठि । कवळिती आत्मा ॥६२॥तेथील गुणत्रये बांधुनी । येती अनाहत भुवनी । जेथ नांदे पीनाकपाणि । उभे सहित ॥६३॥तेथ योगी विर भारती । बैसोंनि पवनाच्या रथीं । मन करुनि सारथीं । मांडिति युध्द ॥६४॥ते विचाराच्या कटका । लाउनि बुध्दीच्या पतका । सारुनी ज्ञानाची टीका । झोंबती तेथे ॥६५॥तेथ अनुहाताचें निशाण । नादे दाटे त्रिभुवन । कल्लोळ करिति योगिजन । संग्रामशौरेशुर ॥६६॥ते दुर्ग विशाळ अति पाडें । बारा यंत्रे बारा हुडे । साठि शतें सैन्य देव्हडे । घरंटी भवें ॥६७॥तेथ नकारु पुरोहितु देवा । पणन स्वरें योगीयाचा यावा । तेथ युध्दाची महादेवा । हाव नुपजे ॥६८॥असो हें साधक करुनि लागी । भीतरी प्रवेशता वेगीं । ते धवलागीरिचा राजयोगी । जींकति हरु ॥६९॥तयाचें ठाणें उत्थापीति । आपुली मुद्रा घालिती । पाठीं बाहे पीटोनि चालती । उर्ध्द पंथें ॥७०॥देखती शोडश दुर्ग शोभा । ऊँ कारु रक्षण चंद्रप्रभा । राजा जीवेश्वर वल्लभा । अविद्यांबिका ॥७१॥जेथ सोळा चामुंडा नेटी । फीरे सहस्रा येकाची घरटी । तेथ सीध्द कळवटी । मांडीति थोर ॥७२॥मन मारुत घालुनी पुढारें । घॆती विशुध्दाचे गाभारे । चंद्र ही गीळूनि ठकारें । चालती पुढां ॥७३॥तेथ ऊर्ध्द कडा निकट । फोडोनि करीति पायवाट । बळें भेदुनि तालु कपाट । चालती वरुतें ॥७४॥मन प्राण घोडें । घालुनी वावडती पुढें । फोडोनि तळोलीचें धेडे । मोडीति चोहटा ॥७५॥अनुहाताचां गजरीं । वेढिती व्दिकोट नगरी । तेथ समर्थेंसी जुंझांरी । निकट घॆति ॥७६॥तेथ येक सहस्र महामंत्रे । सुटती आग्रीचि यंत्रें । तेथ संग्राम करीता गात्रें । विकळें होति ॥७७॥तर्हि ही विभांडोनि सुभद्रा । घालिती आपुली मुद्रा । त्रिवेणी शोषीतां योगीद्रा । निमिष न लगे ॥७८॥असें स्वबळी वरीष्ट वीर । घेती षट्चक्राचें अधीकार । मातावली मातले स्थीर । नव्हती तर्हिं ॥७९॥खौनि भ्रूमध्यें लोचन । करीति सत्रांवीचें पान । तेणें अधिक ची स्फुरण । भरे आंगीं ॥८०॥पुढां ब्रह्मरंध्र सहस्रदळ । तेजोन्मळित निर्मळ । हे तो सर्वोर्ध्द सकळ । कळले तुह्मां ॥८१॥ते ब्रह्मरंध्रीचा हुडा । पालटितां होय रगडा । जेथ निमे झगडा । विचार दळ ॥८२॥मन पवनादि जुझार । त्याचें हि होय शतचूर । येर गुणग्रामवीर । कोण मानी ॥ ८३॥ते सहस्रदळीं जुंझारु । निशंकु निकटु योगी श्वरु । पालटोनि अधीकारु । बैसे तेथें ॥८४॥ते सहस्रदळिं पवित्र । राज्य करी येकछत्र । तेथ लाभे सर्वत्र । स्वयंब्रह्म ॥८५॥जो बोलिजे ब्रह्मानंदु । तो ही येथीचा ची विनोदू । परमात्मा सचिदानंदु । येथें चि लाभे ॥८६॥आतां या ध्यानासी कारण । ते समाधींचें लक्षण । मनाचे उन्मळण । होये जेणें ॥८७॥शुध्द समाधिचेंनि संचारे । इंद्रिये सांडवती विकारें । तेव्हां मृत्युदशा शरीरें । साधजित ॥८८॥कूर्म आंगाते लपवी । किं अस्तुमानीचा रवी । इंद्रियें आंकोचती तेवी । समाधी मध्यें ॥८९॥समाधि विकार नसे । परी ते सदा ब्रह्मी वसे । ब्रह्मी ब्रह्म प्रकाशे । निरंतर ॥९०॥हे पूर्णब्रह्म समाधी । साधकां दिव्य औषधी । अंति मध्यें आदि । ब्रह्म चि हें ॥९१॥ध्यानीं आनंदु भरे । तेणें स्वयं ब्रह्म हें विसरे । हें समाधीलक्षण चातुरें । वोळखावे ॥९२॥सर्व देहाचा विसरु । तै समाधी हा निर्धारु । परि येथें चमत्कारु । थोरु असे ॥९३॥देहिं मृत्युदशा सकळ । परि आयुष्य चिरकाळ । अंगछेदीं अशुध्द जळ । न दिसे कांहिं ॥९४॥हा पंथु शस्त्रधारेवरी । नित्यें कृदांतासीं जुंझारी । क्रीडा कीजे फणीवरी । ते हें साधी ॥९५॥मेरु चढावा पायिं । समुद्र तरावा बाहिं । विषग्राशावें देहिं । ते हें साधि ॥९६॥गगन धरावें वावें । वज्राचें भातुकें खावें । प्रलयातें पुसावें । ते हें हाव ॥९७॥आपुला आंगी चालावे । माथां बैसीण डोलावें । जिव्हे रत्न विंधावें । ते हे वस्तु ॥९८॥॥ इति समाधी ॥ इति षडांगयोग समाप्त ॥====जो संसार देखे वृथा । सांडी हव्यासु अन्यथा । तो जाणिजे सर्वथा । संसारमुक्त ॥९९॥देह नाशीवंत देखोनि । जो सुटे देहापासुनि । तो जाणिजे भर्वसेनि । देहोमुक्त ॥१००॥जो जीवपणें सुटला । तो जीवन्मुक्त संचला । मिं ब्रह्म हें विसरला । नित्यमुक्त तो ॥१॥देह अभिमान योगवरिष्टा । भोगाचा अभिमान कर्मिष्टा । मोक्षाचा अभिमान ज्ञाननिष्टा । ब्रह्मीष्ट निराभिमानी ॥२॥ज्ञान ध्यान आचार । क्रिया कर्म व्यवहार इत्यादि बंधन हा निर्धार । मानि तुं गा ॥३॥जों भेदी निर्धारु आहे । जों मनी हेतु राहे । तो हें बंधन कैसे नव्हे । विचारी तुं ची ॥४॥यास्तव निर्विकल्प समाधि । तुज सांगों ये प्रबंधीं । जेथ समता होय बुधी । तें आइक आतां ॥५॥येक सुखासनी बैसोनि । मार्गु क्रमति अहनिं । येक शीरीं भारु घेउनि । चालती पंथें ॥६॥सुखासनी जे आले । ते विश्रांतिसुख पावले । येर दरिद्री राहिले । अविश्रांति ॥७॥तेवि विण कष्टें प्रयासें । जोडलें कहि हिं न नसे । तैसें स्वयं सत्सिध्द प्रकाशे । ते चि घेइं ॥८॥स्वयं व्रह्म ब्रह्मबोधीं । असी समता होय बुध्दी । ते हे घे पूर्ण समाधी । निर्विकल्प ॥९॥जेथ मन समूळ बुडे । बुडालें काहि हिं नुपडे । असें करणीविण जोडे । तें चि घ्यावे ॥१०॥इति निर्विकल्पसमाधि ॥====जेणे चाळा लाविलें मन । ते हें विताळ दुर्धष्ट मन । हे वस्तुज्ञाना वाचून । स्वस्थ नव्हे ॥११॥कळपां चुके हरण । किं मार्गु भ्रमे जन । तैसें बुध्दीभ्रंश मन । स्वस्थ नव्हे ॥१२॥या मनाचे संगती । विषयपुढां चि धावति । पांठीं इंद्रियें वावडती । त्याची मोहरां ॥१३॥यास्तव ते योगी जन । ठाइं चि मारिती मन । विषयांचे उन्मळन । तें चि होय ॥१४॥तै इंद्रियें मेलिं सहसा । एणें होय वेडी दशा । हें नये आत्मप्रकाशा । सर्वज्ञपणें ॥१५॥तरी शीष्या तूं असें करी । हें मन कदा ही न मरी । भांबावलें आंवरी । फांकुं नेदी ॥१६॥पूर्णब्रह्मीं मन खुंते । तेथ विषयजाळ नेमें गुतें । इंद्रियां हि चि भरते । तेथें चि भरे ॥१७॥भलें मारिलिया परीस । राखतां हित बहुवस । कां जे सुख गौरव यश । राखतां जोडे ॥१८॥हें सर्वापासुनि वळावें । पूर्णब्रह्मीं निक्षेपावें । पाठीं साधनें दमनें सीणावें । लागे चि ना ॥१९॥तु या मनातें वळी । उठली वासना तें पीळी । तैं ब्रह्मसुखाचि दिवाळी । पाहेल तुज ॥२०॥॥ इति मन ॥====हा ग्रंथु ज्ञानबीज । सोय दायकां साध्यें काज । परि निष्ठां चोज भोज । विस्तारलें हें ॥२१॥हें भ्रमिका रसायण । संसारतापा पाचन । अज्ञाना प्रकाशे ज्ञान । तें हें शास्त्र ॥२२॥हें शब्दनक्षत्र तुटलें । ग्रंथरेखे प्रकाशले । पदार्थी शोभले । तजोन्मय ॥२३॥हें शब्द तारा निमैल । तेव्हां ग्रंथरेखा आत्सादेल । पाठिं आपण चि उरैल । आदि वस्तु ॥२४॥ये परी हा ग्रंथ प्रमाण । अति दीसे शोभायमान । प्रकाशीं खोउनि मन । वस्तु पाहे ॥२५॥मुखीं स्वादु साखर । सरे तर्हिं मुख स्छीर । तैसें उरैल साचार । आदि अंति ते ॥२६॥असो यें सगर्भें उत्तरें । प्रत्यक्ष दाविलें श्रीसिध्देश्वरें । तर्हिं त्रिंबकु ह्मणें बोलों सामोरें । देहज्ञान ॥२७॥इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे विवरणे अभ्यास योगो नाम अष्टम कथनमिति ॥८॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP