मध्यखंड - प्राण शतायु

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


तो कुंडलनीचेनि अंगे । श्वास फीरोनि पुष्टीभागें । ब्रह्मव्दारीं संचरुनि निगे । नासिकव्दार ॥१३॥
हकारें बाहिरा निगे । सकारें भीतरा रीगे । ये चि प्रवृत्तिचेनि मार्गे । अक्षरें दोनि ॥१४॥
हे प्रणवा गायत्री । प्रगट जाले सर्वत्री । पाहतां इचाचि सूत्री । ब्रह्मादिक सर्व ॥१५॥
हा जपु सर्वासी कारणु । येर उपाधी पासूनु । सहज चाले ह्मणौन । अजपा बोलिजे ॥१६॥
जै याचें शुध्द ज्ञान होये । तैं अन्य जपे काज काये । याचि हि तुज सोय । सांगों आतां ॥१७॥
पुरी आह्मि आरंभीला ग्रंथु । येथ बोलावा परमार्थु । प्रगट करावा गुह्यार्थु । ते हें कवित्व ॥१८॥
कवि कर्ता स्वभावी । तो चि महत्व वाढवी । तैसी नव्हे माझी वोवी । प्रसिध्द पाहाणे ॥१९॥
आप मीर्वे कीति येक जन । हे प्रसीध्द वचन । परी विश्व जे घेईल गुण । तें चि साच ॥२०॥
विवेक विचारु ज्ञानबोधु । वरि हा गुह्यार्णव अगाधु । नाव ठेविलें बालबोधु । तरि अलिप्त नव्हे ॥२१॥
नामें विकाविं बोलणी । ते अंतरी होति सुनी । ते नामा आणि मांडणि । ग्रंथी न पडे ॥२२॥
दरिद्री ह्मणावा कुबेरु । मोळिकु ह्मणावा ईश्वरु । दीन ह्मणावा पुरंदरु । कोण प्रतिष्टा ॥२३॥
कां झोळीये कनक मेरु । कोण नामाचा अधिकारु । नीच नामें सुंदरु । तो चि नीका ॥२४॥
ब्रह्मा ह्मणीजे विधाता । अनंग ह्मणीजे रतिकांता । पूर्णासी सून्य ह्मणता । अपवादु न लगे ॥२५॥
स्थाणु ह्मणती त्रिलोचना । पार्वतीये नाम अपर्णा । या नीच नामीं महिमाना । न चुकती ते गा ॥२६॥
तैसा नीच नामें बालबोधु । परी हा ज्ञानगुह्याचा सींधु । तरी हें मीं चि का ह्मणों प्रसीधु । सांगैल ग्रंथु ॥२७॥
जे शतायु प्रमाण । श्रृतीस्मृतिचें वचन । तें सांगों निक्षपुन । रोवाडें चि ॥२८॥
येणे ची प्रमाणें सकळैक । शत भोगिती ब्रह्मादिक । योगी देह रक्षणार्थ साधक । या चि प्रमाणें ॥२९।
देहो नाशे अल्पकाळें । तर्‍हिं हें प्रमाण न टळे ।परि हे गुह्य कोण्हि कोण्हे वेळें । कोण्हाहि न संगे ॥३०॥
असो हें शतायुतें असें । नाना प्रमाण शतवर्षे ।प्राण श्वासोश्वासें । चाले तें असें ॥३१॥
दाहां अक्षरां प्राणु असे । अधिकां अक्षरीं आयुष्य वसे । उणीं अक्षरें होति तैं देह नाशे । अक्षर भोगें ॥३२॥
व्दादश पर्वे बाहिर निघे । दशांगुळें भीतरी रीगे । ये तुटीस्तव लागे । मृत्यु पंथी ॥३३॥
अधीका पर्वें धावे का वेगकारी । तैं वोढे मृत्याची दोरी । उणा चाले कां पर्वे वारी । तैं आयुष्य चढे ॥३४॥
प्राणु समपर्वें चालता । कां देहिचा देहि चि असता । तरि कोण प्राणि मरता । एणें मरणें ॥३५॥
यासी साक्षि हरिहर । ते थीर प्राण देह चीर । प्राण रक्षुनी योगीश्वर । अमर होती ॥३६॥
असें प्राण मर्यादे वर्तती । यास्तव प्राणी ह्मणीजती । जीव तरी जीवे चि जिती । मनें वर्तती मानवी ते ॥३७॥
प्राणाक्षरें जाणिजसु । हा देहिं दो पक्षाचा हंसु । परी निर्गम प्रवेशु । नामाक्षंरी हा ॥३८॥
थूळा सूक्ष्मा उभयता । हा प्राण हंसु रक्षिता । जीव दशेतें झाडिता । हा चि होये ॥३९॥
आईक जपाचें प्रमाण । दाहा अक्षरां प्राणु जाण । पळाचें सा प्राण । सत्य मानी ॥४०॥
घटिकें तीनसें साठी मंत्र । सासें येकवीस सहस्र अहोरात्र हे प्रमाण सर्वत्र । जाणत चि असे ॥४१॥
सालक्ष अठेताळिस सहस्र वरी । हें प्रमाण मासा माझारी । सहस्र स्याहांतरी लक्ष सत्याहातरी । संवत्सर संख्या हे ॥४२॥
शत वर्षांचे आयुष्य । सत्याहातरी कोटी स्याहातरी लक्ष । प्रमाण मुडा प्रत्यक्ष । यासी बोलिजे ॥४३॥
या प्रमाणाचें संचित । जीव देहातें भोगीत । हें न सरे तंव सचेत । असे प्राणु ॥४४॥
श्वास प्रमाण नेटके । पर्वा अक्षरां हि न चुके । तैं शतवर्षें स्वस्तीकें । वसावें प्राणें ॥४५॥
असो हे अहोरात्रि निरुतें । येकविस सहस्र सा शतें । येणें जपे पूजी देवते । अखंड जीव ॥४६॥
साशें आधारीं गणपति । पुढां लिंगी नाभी अनुहातीं । सां सां सहस्राचि गति । या तिहिं चक्रीं ॥४७॥
वरीचिले तिन्हि पवित्रें । पूजी सहस्र सहस्र मंत्रें । आतां चक्रें सर्वत्रें । सांगो निकी ॥४८॥
॥ इति प्राण शतायु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP