मध्यखंड - सहस्र दळ
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
असों हे ब्रह्मरंघ्रि सामोरा । जपु निगे लं कारा ।घेउनि निराक्षरा । फीरे चक्रीं ॥१००॥
सर्व मातृकांचा मेळु । वरि त्रिशून्य अक्षराचा धोळु । ह्मणौनि होतसे गोदळु । नाना ध्वनिचा ॥१॥
तु पाहे लयलक्ष लाउनि । कां बोटे दाटि दोहिं श्रवणि । सहस्र ध्वनि उठे ध्वनि । ते त्या बीजाक्षराची ॥२॥
ऊँ कार ध्वनि शुध्दि । ते हि पाहे याचि मधि । या खालती शुध्दी । वायु आवर्ताची ॥३॥
या ही खालुता घर्घरीतु । सर्व गांत्रीं गर्जतु । तो वोळखावा सदंतु । तेजोद्भवीतु ॥४॥
अहंकार नाद मधुर । जेणें चळे शरीर । तो ब्रंह्म रंध्रिं निरंतर । मंजुळ चाले ॥५॥
सहज आलें ह्मणौन । केलें या नादाचे कथन । यर्हवीं सहसा हें वचन । उघडों नये ॥६॥
असो ते सहस्रदळ गहन । पूर्ण सत्यलोक स्थान । दाहा अक्षरें पूर्ण । पत्रिं जपु ॥७॥
एवं ते सहस्र दळें । दोनि घटिका सेंताळिस पळें । चाळीस अक्षरें चळें । प्रमाण याचें ॥८॥
सहस्र दळी जपु निरसे । तों सूर्य बिंब प्रकाशे । मागुता येऊनि बैसे । आधारिं जपु ॥९॥
तें ‘हं’ बीज अमळदळ । नानावर्ण तेजपुंजाळ । उदैले रविमंडळ । हारपे प्रभे ॥१०॥
अंबेचे पृछे वरुनि । वर्णू बोलिले शूळपाणि । नेत्र दाटिजे त्राहाटोनि । दिसे तैंसें ॥११॥
कां निधावलां डोलां आंधारि । दिसे रक्त पिजरी ।त्याही अनंत प्रकारीं । विशेष तेज ॥१२॥
तेथ देव निराकारु । परमात्मा परमेश्वरु । चैतन्य शक्ति निर्धारु । अरुप स्थान ॥१३॥
॥ इति सहस्र दळ ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP