मध्यखंड - राजसगुण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


ऐसी सात्विकें कर्में करीति । त्यासी तं उर्ध्दगती । आतां सांगों वित्पत्ति । राजसाची ॥२४॥
जें प्रस्परें प्रीति घेणें देणें । करीति डंबार्थी भजनें । राजसी यागु उद्यापनें । पव्हे छत्रें ॥२५॥
यक्ष ग्रह पितरगण । याचें करीति भजन । फळा उद्देशीं मन । अखंड त्याचें ॥२६॥
राजस वृत्ति जी धर्मे । ऐसी जें निफजती कर्में । ते मध्यगती नियमें । देति होतीं ॥२७॥
तया नाहीं अधोपतनें । या चि परी उर्ध्द भुवनें । यास्तव मध्यगतीची भोगणें । तेंही पुरुषीं ॥२८॥
गुणकर्मानुसारें । घेति नरांची शरीरें । ऐसी जाणावीं चतुरे । रजोगुणजनिते ॥२९॥
॥ इति राजसगुण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP