मध्यखंड - गर्भवासु
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
ऐसी गुणत्रयें प्रमाणें । जीवां गुणंसगे देहे घेणें । परी रजोगुण मनुष्य होये हें सांगणें । माडलें आह्मा ॥४३॥
जे ज्यासी नेमले आहार । ते चि त्याचें संचरण व्दार । अन्नेची जीव साचार । देहीं संचरति ॥४४॥
ऐणें व्दारें रेति मिळती । मथनें योनी संचरती । भेटी होय शोणिती । मातुगर्भी ॥४५॥
रक्त मांस मेद मळ । हें जीवबीजें सकळ । पण शुकिते शोणिते केवळ । ये योनिचे देह ॥४६॥
योनिगर्भी आधिष्ठानी । असे मूळीं त्रिकोण वन्ही । तो अपानु दीप्त करी त्यापासुनि । कर्द्दमु शोषे ॥४७॥
मेद्रस्थानीं निरुती । जियेतें सिध्द वंदिति । ते कामाक्षा शक्ति । रक्षी गर्भु ॥४८॥
योनि मध्यें महालिंग । असे पश्चिममुख चांग । तेणें वाढते अंग । गर्भाचे त्या ॥४९॥
श्वेत पुष्पा ऐसें । योनि मध्यें कमळ असे । तेथ शोणित वसे । रजस्वळेचें ॥५०॥
॥इति गर्भवासु ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2018
TOP