मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|करुणासागर|पूर्वार्ध| पदे १६०१ ते १६५० पूर्वार्ध श्रीगुरुदेवचरणमहिमा श्रीगुरुदत्तचरणीं आत्मनिवेदन पदे १ ते ५० पदे ५१ ते १०० पदे १०१ ते १५० पदे १५१ ते २०० पदे २०१ ते २५० पदे २५१ ते ३०० पदे ३०१ ते ३५० पदे ३५१ ते ४०१ पदे ४०२ ते ४५० पदे ४५१ ते ५०० पदे ५०१ ते ५५० पदे ५५१ ते ६०० पदे ६०१ ते ६५० पदे ६५१ ते ७०० पदे ७०१ ते ७५० पदे ७५१ ते ८०० पदे ८०१ ते ८५० पदे ८५१ ते ८७२ पदे ८७३ ते ९०० पदे ९०१ ते ९५० पदे ९५१ ते १००० पदे १००१ ते १०५० पदे १०५१ ते ११०० पदे ११०१ ते ११५० पदे ११५१ ते १२०० पदे १२०१ ते १२५० पदे १२५१ ते १३०० पदे १३०१ ते १३५० पदे १३५१ ते १४०० पदे १४०१ ते १४५० पदे १४५१ ते १५०० पदे १५०१ ते १५५० पदे १५५१ ते १६०० पदे १६०१ ते १६५० पदे १६५१ ते १७०० पदे १७०१ ते १७५० पदे १७५१ ते १८०० पदे १८०१ ते १८५० पदे १८५१ ते १८९६ करुणासागर - पदे १६०१ ते १६५० नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला. Tags : karunasagarmarathinarayanकरुणासागरनारायणमराठी पदे १६०१ ते १६५० Translation - भाषांतर तूं सर्वाचा अधिपती । तुझा महिमा सर्व गाती ॥ म्हणोनि तुतें विनंती । करितों देवा सर्वज्ञा ॥१॥शरणागतातें रक्षावें । प्रणतपालन करावें ॥ पतितातें उद्धरावें । क्षमावंता सर्वज्ञा ॥२॥आतां कोणता प्रकार करूं । कोठें राहूं कोठें फिरूं । सद्गुरू करितों नमस्कारू । धांव आतां सर्वज्ञा ॥३॥क्षमा करोनि अन्याय । देवा दावीं निजपाय ॥ किती आतां दत्तात्रेय । छळिसी तुझा असें मी ॥४॥तुझी भेटी घ्यावी । तुझी वाणी आयकावी ॥ ही वार्ता असावी । बहुधा गुप्त ॥५॥ऐसें असतां प्रसिद्ध झाली । मीही लोकीं चाउटी केली ॥ सर्व आतां शेवटा नेली । पाहिजे देवा ॥६॥समर्थाचे धरिले पाय । आतां लोकांची भीती काय ॥ माझा सद्गुरु दत्तात्रेय । प्रसिद्ध व्हावी हे कीर्ति ॥७॥आतां लोकांचा दरारा । कासया बाळगूं क्षमासागरा ॥ माझा सद्गुरू भक्त - आधारा । तूंच अससी ॥८॥गुरुशिष्याचें नातें । त्रैलोक्याचें साजे तुतें ॥ माझें विशेष तूंच मातें । सर्व कांहीं उपदेशिलें ॥९॥आतां चोरी कायसी । कासयाची शंका करिसी ॥ दत्तात्रेया समदर्शी । येईं आता सर्वज्ञा ॥१६१०॥आतां मातें त्यागिलें । तरी तुझेंच नांव गेलें ॥ म्हणोनि आतां पाउलें । दावीं देवा सर्वज्ञा ॥११॥तुज व्हावें तैसें नारायण । घडवीं आतां मजकडोन ॥ मी तों आलों सर्वथा शरण । हातीं धरोनि वागवीं ॥१२॥आतां देश नाहीं मातें । मी तों शरण आहें तुतें ॥ एक नमस्कारापरतें । कांहीं न घडे मनवस्तु ॥१३॥माझ्या आर्ताच्या कल्पना । नानातर्हेच्या योजना ॥ पाहोनि देवा नारायणा । विलंब आतां न लावीं ॥१४॥तुझेसाठीं कल्पना करितों । तुतें सर्वथा शरण येतों ॥ आतां माझे काय पहातो । अंतरींचे तरंग ॥१५॥नाना योजना योजितों । बहुतेकांचे पाय धरितों ॥ अंतरीं बहूत झुरतों । तुझे साठीं सर्वज्ञा ॥१६॥कैसा तरी भेटो सद्गुरू । म्हणोनि करितों नाना विचारू ॥ जाणत असतां उशिरू । नको लावूं सर्वज्ञा ॥१७॥कल्पनादि दयाळा । पाहोनि विलंब लाविला ॥ तरी माझा घात झाला । सद्गुरू देवा ॥१८॥मी त्वदाश्रयचि असें पाहें । तुतें सर्वथा शरण आहें ॥ जाणत असतां विलंब काये । लाविसी समर्था सर्वज्ञा ॥१९॥मी तों सर्वथा शरण आहें । तुझे पायीं पडिलों पाहें ॥ आतां सर्व कांहीं उपाये । करणें तुतें सर्वज्ञा ॥१६२०॥पूर्वींपासोनि तुतें पाहीं । शरण नव्हतों ऐसि नाहीं ॥ पहिल्यापासोनि तुझे पायीं । शरण आहें सर्वज्ञा ॥२१॥नवीन मागुती शरण । कैसा येऊं नारायण ॥ जैसा यावा तैसा शरण । आहें तुतें अनादि ॥२२॥सत्य सर्वथा आहें तुझा । आतां सांभाळ करीं माझा ॥ धांव आतां सर्वज्ञ राजा । दत्तात्रेया दयाळा ॥२३॥आतां दिवस सरले । घडी पळही भरले ॥ कंठीं प्राण उरले । सर्वज्ञ देवा ॥२४॥लोक सांगती प्रकार नाना । परी न येती माझे मना ॥ तुझें माझें विटेना । प्रेम देवा कालत्रयीं ॥२५॥कोणी सांगों काई । परी माझें प्रेम तुझे पायीं ॥ तुझे करितां प्राणही । गेला तरी पुरवला ॥२६॥तुझें माझें प्रेम पूर्ण । जरी होईल किंचिन्न्यून ॥ तरी देवा पावेन पतन । दत्तात्रेया सद्गुरो ॥२७॥पहावे दत्तात्रेयाचे चरण । हाच माझा कुळधर्म पूर्ण ॥ माझी गती आम्हां पूर्ण । दत्तात्रेयचि असे ॥२८॥अनेक आचरोनि दोष । धरोनि बैसलों तुझी आस ॥ धांव आतां जगदीश । दत्तात्रेया सद्गुरो ॥२९॥आतां काय सांगावें । सर्व कांहीं जाणावें ॥ आतांच धांवणें धांवावें । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥१६३०॥माझी तों मति गेली । ऐसें म्हणतोसि वनमाळी ॥ परी सद्गुरु माउली । जाणसी तूं अंतर ॥३१॥हिताहित समजावें । तारतम्य जाणावें ॥ तेंही सर्व देवें । सांगितलें मज ॥३२॥तथापि मातें राहवेना । कैसी करूं मी योजना ॥ काबू कांहीं नारायणा । माझा नाहीं सर्वज्ञा ॥३३॥कंठीं घालोनियां फासी । पारधी ओढी मृगासी ॥ तैसी अवस्था हृषीकेशी । झाली माझी सर्वथा ॥३४॥माझा नाहीं दुराग्रह । माझा नाहीं निग्रह ॥ हा तुझाच अनुग्रह । आहे सत्य ॥३५॥सर्वज्ञ देवा सद्गुरू आई । माथा ठेविला तुझे पायीं ॥ तुझे हातीं हात दोहीं । दिधले मग ॥३६॥आतां पाहिजे तैसें करीं । मारीं अवस्था तारीं ॥ सर्वथा आतां सर्वज्ञ हरी । तुझाच आहें समर्था ॥३७॥तूंच काळाचा काळ । तुझें सारें बुद्धिबळ ॥ मी तों तुझा दुर्बळ । काय मजकडे लाविसी ॥३८॥तूं निग्रहानुग्रह करिसी । तैसी त्यातें बुद्धि देसी ॥ तूंचि एक स्वतंत्र अससी । त्रैलोक्याचा धनी तूं ॥३९॥तुतें सह्रण आहें । तुझी चाट पाहें ॥ पाहिजे तैसें सद्गुरू माये । करीं मारीं तारीं तूं ॥१६४०॥तुतें आहें सर्वथा शरण । तुतें करितों वंदन ॥ आतां यातें नारायण ॥ पाहिजे तें म्हणावें ॥४१॥कोणी म्हणती पोरपण । कोणी म्हणती मूर्खपण ॥ कोणी म्हणती पिशाचपण । करितो मंद ॥४२॥कोणी म्हणती अविवेक करितो । कोणी म्हणती उगाच फिरतो ॥ कोणी म्हणती अविचार करितो । मूढ आहे ॥४३॥कोणी म्हणती साहस करिसी । कोणी म्हणती वृथा मरसी ॥ कोणी म्हणती कां दवडिसी । नरदेहरत्न ॥४४॥देवा जैसी ज्याची मती । तैसा मातें बोध करिती ॥ परंतु माझी अंतरस्थिती । आहे तैसी जाणसी तूं ॥४५॥पाहती वरला प्रकार । परी कोणी जाणेना अंतर ॥ विचार अथवा अविचार । जाणसी तूं सर्वज्ञा ॥४६॥मी तों आहें तूतें शरण । सर्व कांहीं तुझें करुण ॥ ऐसें असतां दूषण । लाविती त्या लावावे ॥४७॥लोक करिती भूषण । माझें हें तों दूषण ॥ तुझें दूषण भूषण । होय देवा समर्था ॥४८॥माझेकडे कांहींच नाहीं । मीं तों पडलों तुझें पायीं ॥ पाहिजे तैसें करोनि घेईं । शरण आहें म्हणोनी ॥४९॥आतांच येऊं दे करुणा । नमन करितों नारायणा ॥ धांव आतां दयाघना । दत्तात्रेया सर्वज्ञा ॥१६५०॥ N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP