मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| मिथ्या माया स्वरूप श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण मिथ्या माया स्वरूप रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ ओंव्या Translation - भाषांतर मिथ्या मायेचें स्वरूप । सांगो जातां शब्द सोप । नाहींच त्याचा प्रताप । वर्णितां संताप मानसीं. ॥१॥ गंधर्वनगरींचा भूपति । पुरुषार्थे विख्यात त्रिजगतीं । भीष्मकन्या तयाप्रति । नोवरी निश्चिति नेमिली. ॥२॥ लग्न लागलें वाडें कोडें । सामग्री सिद्ध निज निवाडें । मृगजळाचें घातले सडें । कोल्हेरीघोडे पालाणिले. ॥३॥ चित्रतरूची शीतळ छाया । खपुष्पगंधें हर्ष राया । बंध्यापुत्र मंत्री तया । नाना उपचार जाणविती. ॥४॥ वारयाच्या वळूनि वाती । भिजविल्या कूर्माच्या घृतीं । खद्योततेजाच्या दीप्ति । प्रकाश दिगंतीं न समाय. ॥५॥ रज्जुसर्पाच्या श्रवणीं । घोष पडतां वाद्यध्वनि । दर्पणांच्या अमूप धनी । ब्राह्मण भूरिदानीं कुबेर झाले. ॥६॥ इंद्रजाळींचे राय । गौरविले सहसमुदाय । अजन्म्याची माय । विहिण स्वप्नीं मिरवत ॥७॥ ऊर्णनाभीचें वस्त्रसंभार, । वोडंबरीचे अलंकार, । अश्वशृंगाचे करभार । देऊनी नृपवर गौरविला. ॥८॥ नपुंसकाचे पुत्र । चिरूंदें वर्णिती विचित्र । सत्य नसतां ब्रह्मसूत्र । लग्न ऐसें लागलें. ॥९॥ अमूप सामग्री वेंचिती । दिवसा अंधार जोखिती । आंधळे पाहोनि देती । थोटे घेती स्वहस्तें. ॥१०॥ पांगुळ नटवे नाचती । मुके गायनें गाती । बधिर श्रोते ऐकती । बोहला शोभती नोव्हरे ते. ॥११॥ अश्वत्थपुष्प चूर्ण । माजी नभनीळिमा संपूर्ण । एकत्र करितां पतिवर्ण । वस्त्रें शोभले वर्याडी. ॥१२॥ पिळूनि मोतियांचें पाणी । वरी शिंपिती वर्हाडिणी । दिगांबर वधुवरां भरणी । लग्नमंडपीं मिरवती. ॥१३॥ मिथ्या माया यापरी । रूपक करतां कवेश्वरीं । व्यर्थ शिणवावी वैखरी । उदकमथन वावुगें. ॥१४॥ घाणा घालूनि वाळूं । निरर्थक काय गाळूं । अजागळस्तन पिळूं । आकाश कवळूं कांसया. ॥१५॥ करितां सारासारविचार । विष्णुनामस्मरण सार । सद्गुरुभजन निरंतर । वाचे उच्चार श्रीराम ॥१६॥ विश्रांतीचें जन्मस्थान । सतरावियेचें स्तनपान । करूनियां सहज पूर्ण । निजानंद रंगावे. ॥१७॥संपूर्णमस्तु । N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP