मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीरंगनाथस्वामी| शुकरंभासंवाद श्रीरंगनाथस्वामी प्रस्तावना आणि चरित्र श्रीगुरुगीता रामजन्म अध्याय १ ला रामजन्म अध्याय २ रा गजेंद्रमोक्ष निजानंदसाधने सुदामचरित्र शुकरंभासंवाद पंचीकरण मिथ्या माया स्वरूप ओंव्या बद्धमोक्षविवरण स्फुट पदें १ ते ५ स्फुट पदें ६ ते १० स्फुट पदें ११ ते १५ स्फुट पदें १६ ते २० स्फुट पदें २१ ते २५ स्फुट पदें २६ ते ३० स्फुट पदें ३१ ते ३५ स्फुट पदें ३६ ते ४० स्फुट पदें ४१ ते ४५ स्फुट पदें ४६ ते ५० स्फुट पदें ५१ ते ५८ मार्तंडाष्टक करुणाष्टक श्लोकपंचक गरुडसत्यभामागर्वहरण शुकरंभासंवाद रंगनाथ स्वामींचा ( निगडीकर ) जन्म शके १५३४ मध्ये मार्गशीर्ष शु. १० मी रविवारीं झाला. Tags : ranganath swami poemकवितामराठीरंगनाथ ओव्या Translation - भाषांतर जयजया गिरिजात्मजा । अनन्यभावे तुझी पूजा । करुनियां आत्मकाजा । शरण वोजा रिघालो ॥१॥ ॐ नमो वाग्विलासिनी । वीणा, पुस्तकधारिणी । जिव्हे नवरसदायिनी । होई जननिये जगदंबे ॥२॥ महानुभाव विद्वज्जन । तयांसि करुनिया नमन । गुरु परब्रह्म परिपूर्ण । सच्चित्सुवर्ण जग नग ॥३॥ अभिवंदिला तो स्वामी । जो निजानंदधार्मी । रंगला अनामनामी । विराजे कमी निष्कर्मी ॥४॥ स्तवन करितां आर्जव जने । संतोषोनि प्रशस्त मने । शारदा गुरु गजानने । सुप्रसन्न बोलिजे ॥५॥ स्फूर्ति पावेनि प्रसादे । कथाकौतुक विनोदे । वर्णाक्षरी विचित्र पदे । पैल ती द्वंद्वे प्रमेयासि ॥६॥ कोणे एके दिवशी । नारद आला इंद्रसभेसि । कलिकालाचे गमन त्यासि । वृत्तांतासि जाणत ॥७॥ इंद्र पुसे मुनिवर्या । कांही सांगावे आश्चर्या । कोण करितो तपश्चर्या । अपर सूर्यासारिखा ॥८॥ मृत्युलोकी तपोनिवि । कवण आहे सांगा सुधी । नारद म्हणे रे महोदधि । तुज बुध्दि स्फुरेना ॥९॥ राहूं नको निजपुरा । नेणसी शुकयोगीद्रा । सिध्द- वनी त्यासि थारा । जगदोध्दारा अवतरला ॥१०॥ अमानित्वादि दैवी । संपत्तीचा गोसांवी । मुक्त - मौक्तिक अनुभवी । चिदर्णवी जन्मला ॥११॥ देहादि भुवनत्रय । जाणोनियां तृणप्राय । स्वरुपान्वये निर्भय । वर्णू काय तयासि ॥१२॥ शापानुग्रहार्थ । कदाचित धरिला स्वार्थ । तुझिया पदासि अनर्थ । जाणे यथार्थ वोढवला ॥१३॥ ऐसी लावूनियां कळा । गमन केले तयेकाळी । या उपरि इंद्र शोकजाळी । पडला मेळी चिंतेच्या ॥१४॥ तेचि रसाळ कथा गहन । श्रोती होऊनि सावधान । सर्वागाचे श्रवण । द्यावें अवधान ग्रंथासि ॥१५॥ शुक योगीद्राचे तप । झाले झाले जाणोनि अमूप । अमरनाथ विक्षेप । सचिंतरुप सर्वदा ॥१६॥ वेदशास्त्रासंपन्न । सभेसि आलिया ब्राह्मण । अल्पज्ञाचे दुश्चित मन । तैसे जाण इंद्रासि ॥१७॥ शतमख सांग घडे ज्यासि । इंद्र - पद प्राप्त त्यासि । ऐशा पुण्याच्या राशी । शुकापाशी जाणवल्या ॥१८॥ स्वसामर्थ्ये माझे स्थळ । घेईल लागतां वेळ । विघ्न करावें प्रबळ । सुनिश्चळ होऊनि ॥१९॥ मग विचारुनि मानसी । पाचारियले रंभेसि । छळावया श्रीशुकांसि ।तत्क्षणी योजिली ॥२०॥ अति सुंदर लावण्यगुणे । दिव्य अलंकार भूषणे । सुगंधद्रव्ये वस्त्राभरणे । बाळसूर्यासादृश्य ॥२१॥ नेत्रकटाक्षबाणे । ह्रदय भेदी जीवे प्राणे । पंचविषयांचे धांवणे । निघे दर्शने जियेच्या ॥२२॥ ऐसी रंभा स्वरुपे सुंदर । पाठविली सत्वर । देवोनि उपकरण सामग्री समग्र । योगेश्वर छळावया ॥२३॥ मग मनोबगे चालिली । जैसी विद्युतप्रभा झळकली । विडा पैजेचा उचलोनि गेली । आज्ञापिली ते समयी ॥२४॥ श्रीशुकाचा तपप्रभाव । वना दशा आली अपूर्व । कल्पलता वृक्ष सर्व । हें अपूर्व वर्तले ॥२५॥ ते काननीच सरोवर । अमृताहूनि गोड नीर । पक्षिगायने किन्नर । देहभाव विसरले ॥२६॥ अचळ राहिला वसंत । तेणे सकळ वृक्ष जात । सिध्दचारण मुनी तेथ । अंतर्भुवनी विश्रामिले ॥२७॥ कीटक पक्षी जळचर । चतुष्पादादि वनचर । कोण्ही नाही क्षुधातुर । तृषारहित ॥२८॥ जीवमात्रांसि तारुण्य । शोभे यापरी अरण्य । महिमा शुकाची अगण्य । अपार पुण्य तपाचे ॥२९॥ तेथिचे विचित्र पाषाण । वैडूर्यतेजसंकीर्ण । प्रकाश शशीसूर्येवीण । अणुप्रमाण तम नाही ॥३०॥ नक्षत्रांमाजी सोम । दशावतारी कृष्णराम । अपरसूर्य पूर्णकाम । विश्रामधाम साधकां ॥३१॥ ऐशिया श्रीशुकापाशी । रंभा आली छळावयांसि । तेथिची विचित्र चर्या कैसी । अभिप्रायेसि परियसा ॥३२॥ आली शुकाचिया गुंफेसि । तंव तो ध्यानस्थ मानसी । ऋध्दि वोळंगती दासी । चरणापाशी जयाच्या ॥३३॥ अखंड स्वरुपाकार दृष्टि । ब्रह्मरुप देखे सृष्टि । पाहतां परमामृतवृष्टि । होय पुष्टि जीवांसि ॥३४॥ सच्चिदानंद तनु । जैसा दिसे बाळ जानु । निजतेजे शोभायमानु । मनमोहन साधकां ॥३५॥ निर्विकार मनोवृत्ति। देही विदेही आत्मस्थिति । अभंग भंगेना कल्पांती । ऐसी मूर्ति देखूनि ॥३६॥ कला कौशल्य गीत नृत्य । संगीतगायने रमवी चित्त । हास्यविनोदे रंजवीत । परि तो मुक्त यदर्थी ॥३७॥ नाना वाद्यांचे गजर । परम रमणीय मनोहर । नूपुरांचे झणत्कार । कर्णद्वारी प्रवेशती ॥३८॥ शब्द पडतां श्रवणी । शुक सावध जाहला मनी । काय कौतुक या वनी । म्हणूनि नयनी विलोकिले ॥३९॥ इंदुवदना सुलोचनी । रंभा देखिली नयनी । स्त्रीपुरुषभाव कानी । शुक स्वप्नी नायके ॥४०॥ मुकुट कुंडले कुसरी । तिन्ही नामे अलंकारी । सुवर्ण एक चराचरी । तैशापरी जग देखे ॥४१॥ संकल्प सन्निपात भेद । जल्पती ते मतिमंद । अकल्प बोधे तत्वविद । बोधले स्वपद पावूनि ॥४२॥ ऐसे जाणूनि येरी । पूजन केले षोडशोपचारी । अमृत नैवेद्य वोगरी । उदक सारी प्राशना ॥४३॥ प्रतिमा पाषाण जैसा । मुनी पूजा घे तसा । तेथ कायसी विषयाची आशा । प्राप्त पुरुषा बोलणे ॥४४॥ स्वसुखासनारुढ जाण । तो कां करी वृषभरोहण । नित्य तृप्त भिक्षाटण । करी कवण विचारे ॥४५॥ मळ मूत्नवायस भक्षी । हंस तयांते न लक्षी । पाहतां दोघे पक्षी । सज्ञान दृष्टी जाणती ॥४६॥ मुक्तमोतियांचा चारा । तयां राज हंसा सुकुमारा । वास मानस सरोवरा । रहित थारा न माने ॥४७॥ तैशापरी या योगींद्रा । रंभा दावी काममुद्रा । अवस्थातीत योगनिद्रा । चित्सुखभद्रा ते काळी ॥४८॥ ऐशा योगेश्वराप्रति । रंभा वदे कुश्चळ उक्ति । नपुंसक होसी तूं ये जगती । पुरुष व्यक्ति होऊनि ॥४९॥ आम्हां ऐशा नारी । धुंडितां दुर्लभ चराचरी । एकांतस्थळ त्याहीवरि । वनांतरी असोनि ॥५०॥ सौंदर्य आमुचे विचित्र । श्वान केला विश्वामित्र । न साहे वियोग क्षणमात्र । त्याहूनि अन्यत्र योग्य कोण ॥५१॥ आमुचे नेत्रकटाक्ष । वारी ऐसा कोण दक्ष । इंद्र जाहला साक्षेप । हे प्रत्यक्ष सर्वासि ॥५२॥ मृत्युलोकीचे राय । मानूनि जैसे तृणप्राय । गणना इतरांची काय । कोणीही न जाय जिंकोनी ॥५३॥ जन्मा आलिया पुरुषे । भोग भोगावे सावकाशे । इंद्रिये कोडितां आक्रोशे । महादोषे आकळिजे ॥५४॥ ईश्वरे निर्मिली इंद्रिये । त्यांही करावी आपली कार्ये । न करित प्रत्यवाये । द्रोही निश्चये होशील ॥५५॥ ऐसी मदोन्मत्त प्रमादे । वचन बोलताहे विनोदे । शुक निर्भय स्वच्छदें । अति आल्हादें बोलत ॥५६॥ रंभे तूं प्रत्यक्ष मोहिनी । सकळ कळा प्रवीण गुणी । अंकुर इच्छिसी पाषाणी । घालूनि पाणी सर्वदा ॥५७॥ भस्मी घृतचिया धारा । घातलिया काष्ठभारा । पेटणे नाही वैश्वनरा । भ्रम वोसरा तेवी तुझा ॥५८॥ रंभे तुझे उपाय । निष्फल झाले सांगू कार्य । इंद्रजाळीचे राय । छाये अंगे मारिसी ॥५९॥ ऐसे बोलतां योगेश्वरे । रंभा वदे प्रत्योत्तरे । तूं क्लैव्य होसी निर्धारे । हे मज बरवे कळो आले ॥६०॥ तुझिया मनीचा भाव । मज कळो आला सर्व । हाही मनुष्यलोकीचा जीव । काय अपूर्व मानावा ॥६१॥ ऐसे भाविशील झणी । नहो मृत्युलोकीच्या कामिनी । मळमूत्रे पै धणी । भरिल्या सौंधणी रजकाच्या ॥६२॥ दंतधावन मुखशुध्दि । न करितां ये दुर्गधि । कफ, वात, पित्ते कधी । सांपडल्या त्रिशुध्दि नवजाती ॥६३॥ ऐशा नव्हो आम्ही नारी । स्वर्गलोकीच्या सुंदरी । म्हणोनि आवेशे नखाग्री । उदर चिरी तात्काळ ॥६४॥ दोन्ही करे दोन्ही भाग । करोनि दावी अंतरंग । नानापरिमळ भोग । सुवासें चांग नभपरे ॥६५॥ बावन्न चंदन अपर । जवादि कस्तूरी अगर । विचित्र परिमळ कापूर । सुंगध अपार निघाले ॥६६॥ जाई, जुई, शेंवती । मोगरे चंपक मालती । बकुल पुष्पे केगती । ऐसे येती सुवास ॥६७॥ रंभा बोले श्रीशुकाते । अविश्वास असेल तूते । तरि येऊनि स्वहस्ते । पाहे मागुता एकदां ॥६८॥ शुक ह्मणे विदित झाले । पूर्वी असते जरि कळले । तुझिये पोटी नाही केले । जन्म घेणे ईश्वरे ॥६९॥ बारा वर्षे उदर - कुहरी । श्रमलो मातेच्या उदरी । मळमूत्र नवद्वारी । नरकघोरी न पचतो ॥७०॥ ऐसे बोलतां शुकमुनी । अनुतापे तापली मनी । मग प्रवतेंनियां स्तवनी । येऊनि चरणी लागली ॥७१॥ धन्य धन्य तुम्ही संत । अखंड स्वरुपी शांत । तेथे कायसी हे मात । नित्य तृप्त तयांसि ॥७२॥ स्वामिसेवेचेनि निमित्ते । पूर्वकर्म शुध्द होते । तरीच देखिले चरणाते । पूर्ण चित्ती निवाले ॥७३॥ ऐसे बोलोनि आज्ञा । घेऊनि गेली स्वस्थापना । पतन नोहे योगी - जना । अधिष्ठाना पावलिया ॥७४॥ शचीपति पुसे वृत्त । रंभे सांग यथोचित । तंव ते प्रेमे सद्गदित । हर्षयुक्त बोलत ॥७५॥ सांगो काय कळानिधि । शुकयोगींद्राची बुध्दि । सदां निमग्न तो सुखाब्धी । माजी देहबुध्दि त्या नाही ॥७६॥ आत्मलाभे नित्यतृप्त । लोकाचरणी तो प्रसुप्त । त्याची दशा अति गुप्त । असे लुप्त योगियां ॥७७॥सदाशिवा छळिती भूते । क्षुधेते पीडिले अमृते । तरिच छळणोक्ति श्रीशुकाते । निश्चयाते पावेल ॥७८॥ वागुरे आंतुडे वारा । शीते पीडिजे हिमकरा । तमे दाटिजे भास्करा । तै शुक योगीद्रा छळणोक्ति ॥७९॥ पतंगाचेनि पक्षवाते । शांत कीजे प्रळयाग्नीते । जंबूकभये पंचाननाते । सुखनिद्रा न लागेचि ॥८०॥ चित्रीचे छाया कृष्णसर्पे । गरुड भयाभीत कीजे दपे । तरिच श्रीशुकाते कंदपे । विकलता दीजे देवेशा ॥८१॥ भक्ति विरक्ति आणि प्रबोध । शुकाचे ठायी शुध्द । न कळे महिमा अगाध । त्यासि बाध कवण लावी ॥८२॥ ऐकोनि रंभेचा वाग्विलास । सहितसुरगुरु देवेश । धन्य बोलती श्रीशुकास । मुक्त सर्वासि मानला ॥८३॥ सहजी सहज पूर्णरंग । निजानंद जो नि:संग । सर्व संगी तो अभंग । ग्रंथ सांग पै तेणे ॥८४॥ समाप्त. N/A References : N/A Last Updated : December 16, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP