मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
पुढे काय ?

पुढे काय ?

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


- काही पुसू नकोस ! सात आठ वर्षांपूर्वी त्या... सरकारी कचेरीत होतो, तेव्हाही... असेच... अन् त्या शाळेतही कैक वेळा ?
असेच ! सारखे तास अन् तास...
विचार ! विचार !
अन् तोही पाठीमागचा... अन् पुढचा ! चालू गोष्टीबद्दल...
सुखाची असली, तर ती ‘ चालली !... चालली ! ’ असे म्हणून घाबरायचे... !
तीच दुःखाची असली तर ?
त...र ‘ काय बोवा ? खरेच !! ’ असे म्हणत तिचा विसर पाडण्यासाठी धडपडायचे... !
आणि मागच्याकडे धापा टाकीत जायचे !
पण तिथे काय ! ‘ अरेरे !... गेले !... पुनः नाही !! ’ असे तळमळत...
‘ पुढे काय ?... पुढे काय ! ’ असे म्हणून लगेच डोके उकरायला लागायचे ! राम !... राम !...
सदा ! पुढे काय ? ’ दहा वर्षांपूर्वीही तोच प्रश्न... चार वर्षांपूर्वीही तोच... अन् आजही तोच !!
जन्मास येण्यापूर्वीही... ?
तोच !
अन् प्राण सोडण्यापूर्वी ?
तोच !
सरणात कवटी फुटली तरी... "
‘ पुढे काय !! ’
म्हणजे हे... !
चालायचेच !... चालायचेच !... चालायचेच !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP