गंमत
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- एहेच ! काय पण ऐटीत चालली आहे स्वारी !
- हं: आणि ते मिशांचे आकडे पाहिलेस का ?
- सगळेच झोकबाज आहे न् काय !
- मोठा लेकाचा ऐटीत चालला आहे, धर त्याच्या पटक्याचे
शेपूट, आणि दे पटका उडवून ! पाहू तर खरे कशी काय
गंमत होते ती ! हं: हं: ! चल आण.
- वा ! मोठा शहाणाच आहेस !
- अरे गंमत !
- काय गंमत काय ! कोणाला हे जर समजले तर काय
म्हणतील. हं: ! चमत्कार आहे बुवा ! इतका मोठा झालास,
आणि शिकला सवरलास, तरी म्हणे आपली गंमत !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP