अंदरकी बात

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- पण ती का ? - माझे ऐकत का नाही ?
- अरे, एखादे वेळेस नाही ऐकले. काय आहे त्याच्यात येवढे ?
- पण मी चांगले बजावून सांगितले होते की, मला नाही -
- असे म्हणून कसे चालेल. सवय करायला पाहिजे.
- नाही बोवा, आपल्याच्याने नाही राहवत; आणि पुन: ती माझी बायको
आहे, तिने तर माझे ऐकलेच पाहिजे !
- म्हणजे ! तुझी बायको झाली तरी ती काय माणूस नाही वाटते ?
- असेल. पण मला नाही हे चालायचे ! माझ्या इच्छेप्रमाणेच नेहमी -
- आता आणखी कसे तिने वागायचे ? नेहमी तर तुझ्या इच्छेप्रमाणे ती
वागतेच आहे. पण नाही ! जरा एखादे वेळेस तिने कोठे नाखुशी
दाखविली, किंवा नाही ऐकले - की झाला संताप ! बरे पुन: बाहेर ऐट
केवढी ! आणि काय कवितेच्या गप्पा ! ’ पतिपत्नीने नेहमी मोठ्या
प्रेमाने..... अगदी एक चित्ताने असावे !’
- ऍं ! काय लावली आहे उगीच बडबड !
- हं: ! ’ पतिपत्नीने एकचित्ताने असावे !’ लोकांना वाटते, काय साधू
आहे ! पण अंदरकी बात ? नेहमी आपले नवरोजीबोवांचेच चित्त !
आणि बायकोच्या चित्ताला गळफास !
- तू गप्प बसतोस की नाही ?
- संताप ! लागेल तितका संताप ! खिदिखिदी दात काढून पशूंना
हसता ! पण तुम्ही माणसे - तुम्ही पुरुष पशूंपेक्षाही अत्यंत जुलमी
आहात ! बेशरम !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016