समर्थन

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- बस् येवढेच ?
- पुरे झाले. उगीच जास्त काय करायचे आहेत ?
- अरे घे आणखी चारपाच कागद, माझे ऐक, आपले जवळ असू द्यावेत.
- असे म्हणतोस. बरे तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे -
- पहा तो एकच कशाला ठेवलास आता ? चमत्कारिकच आहेस !
फुकटाचे मिळत आहेत मग का सोडा ?
- अरे पण हे सरकारी कागद आहेत.
- असेनात सरकारी ! सरकारी असले म्हणून काय झाले ? त्याच्यावर
छाप नाही ना ?
- नाही छाप नाही...... पण हे करणे..... ही चोरी करणे बरे नाही.
- ऍं: ! चोरी कशाची आली आहे त्यात ! दीडदमडीचे कागद ते काय !
आणि म्हणे चोरी ! ही: !
- म्हणून काय झाले ? परवानगीशिवाय काहीही घरी नेणे, म्हणजे -
- परवानगी काढायची कोणाची ? आणि असल्या क्षुल्लक बाबतीत ?
आणि ज्यांना म्हणून विचारायचे ते तरी काय करतात ? लागेल
तितके सामान ते स्वत: जर खुशाल घरी घेऊन जातात, तर मग
आपल्याला मुळीच हरकत नाही. ते नाही का सरकारी नोकर ? तसेच
आपण -
- हो तसेच पाहिले तर काही हरकत दिसत नाही. पण मला आपले -
आणि पुन्हा कागद ते काय ! हं:
- हां ! आता कसे ! आणि जरी सरकारी असले, तरी सरकार आपलेच
आहे. तेव्हा त्यांच्या जिनसाही आपल्याच आहेत !
- ही: ही:
- आणि इतके बारीकसारीक गोष्टीकडे जर आपण पहात बसलो, तर
बाबा, जगात आपला निभाव लागायचा नाही. ठाऊक आहे ?

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016