मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
‘ मिस्टिक ’ अनुभव

‘ मिस्टिक ’ अनुभव

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- हे असे काय होते आहे ?
- खरेच... काही तरी...
- आसपसचे जग थरथरते आहे... आणि कुठेतरी खोल खोल आपण चाललो आहोत...
- कुठे ?
- काही समजत नाही...
- पण हे भोवतालचे स्थिर आहे की... त्याचे पाणी झाले आहे... सारखे हेलकावे
- नाहीतर आपल्यालाच काहीतरी...
- छेः ! मला वाटते मी स्थिर आहे... पण कितीतरी अफाट... बांध फुटून... सगळीकडे आपण पसरलो आहोत.
- आणि हे जग... ?
- बुडून... गटांगळ्या खात आहे असे वाटते.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP