एळकोट

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- चल तोंड फिरव ! तिकडे पाहू नकोस.
- कारे बोवा ?
- पहा पुन्हा पाहतोच आहेस ! काही शरम आहे की नाही ?
- अरे पण झाले काय ? हं आला, तो तिच्या अगदी जवळ
आला.
- अरे ए ! चुलीत घातले तुझ्या त्या ज्ञानाला ! शेक्सपीयर
वाचतो आणि ब्राऊनिंग वाचतो !
- अरे हो ! चुकले खरेच. पण -
- चल  मुकाट्याने पुढे चल ! लाज नाही वाटत ? तो कुत्रा...
पाठीमागे पळत आहे, आणि तू तिकडे पहात आहेस !
निव्वळ पशू आहेस !
- भारी बोवा नेहमी तुझी पिरपिर असते ! हे काय हे ! अंमळ
जरा कुठे -
- पुन्हा आणखी वर तोंड करुन बोलतोस ! इतके ज्ञानाने
बडव बडवले, पण शेवटी आपला पशू तो पशूच ! शी: !

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016