साधुस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

साधु श्रीरामचरण, तेथें तापापहरकथा गंगा;
श्रोते जन कामांतक असोनि, संसार नातळे अंगा. ॥१॥
सच्चरित सुधामय, रघुकुलकैरव, रामचंद्र, तत्पाद
सज्जनतापनिवारक; चकोर मोक्षेछु, अमृत संवाद. ॥२॥
हरिगुणजीवनदायक संतचि घन, जीवनाब्धि रघुराम;
जनगत पातक चातक, न जयांचा जीवनांतरीं काम. ॥३॥
राघव सहस्त्रगुणकर, तमोरि, विश्वप्रकाशकर, तरणी.
सज्जन अरुण तमोंतक; कमळपण स्पष्ट एक तछरणीं. ॥४॥
राम कृपाघन, तद्गुण जीवन, आसार संत, तेथ मरु
शरणागत, जो इछी कीं, ‘ ऐसी अमृतवृष्टि नित्य करु. ’ ॥५॥
निजजीवनिधि राघव सिंधु, मिळाल्या तयांत साधुनद्या;
त्यांस मिळाले ओढे शरणागत, कीं स्वरूपचिंतन द्या. ॥६॥
रामपद स्पर्शमणी, शरणागत लोह, संत तें स्वर्ण;
वर्णस्तुति काय, गुणें परिसचे, साक्षीसि देति सत्कर्ण. ॥७॥
राम दयाघन, जीवनदाता, सदुदार, दास ते मोर;
कुटिलगति दर्पविषधर खळसर्प; जयांसि ताप बहु थोर. ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP