शेख महंमद चरित्र - भाग ३२
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
जनार्दनपंत आडवळणी जाऊन ज्या चंद्रभटाकडे चतुःश्र्लोकी भागवत ऐकतात व एकनाथांचे लिहिण्याप्रमाणें ‘स्वानंदी उत्पुलित’ होतात, पुढें ज्या चंद्रभटाची समाधि राजदरबाराच्या प्रमुख ठिकाणीं बांधतात, तो कोण साधा ब्राह्मण नसून ते चांद बोधलेच होते आणि तेच शेख महंमद व एकनाथांचा शिष्य मुकुंदराज सांगतात त्याप्रमाणें जनार्दनपंतांचे गुरु होते यांत शंका नाही. जर एकनाथास चांद बोधल्यांचा हिंदु-मुसलमानांतील प्रचार, वेषवगैरे बाह्यावतार रुचला नसेल, तरच कदाचित एकनाथांनीं आपल्या आजोगुरूंचया नांवाचा उल्लेख टाळणें संभवनीय आहे. परंतु आपल्या आजेगुरूंचा जो ‘स्वामी दत्त’ म्हणून उल्लेख केला आहे तो बहुधा त्यांच्या चतुर्थाश्रमांतील अगर संन्यासाश्रमांतील नांवाचा असण्याचाच अधिक संभव आहे. कारण शेख महंमदहि त्यांना श्रेष्ठ दिगंबर म्हणून संबोधतात. हें नांव अगदीं शेवटीं शेवटीं घेतल्यानें ते संबंधी माणसांशिवाय इतरांना माहीत नसणें हे साहजिकच आहे. एकनाथांच्या गुरुपरंपरेच्या अकरा अभंगाख्यानांतील शेवटच्या दोन अभंगांसारखेच (क्र. १८८३.४) एक जनार्दनपंतांच्या नांवानें गुरुस्तुतीचें प्रकरण त्याच गाथेंत छापलें आहे. त्या कृष्णावतारातील अंकलखोपजवळील औंदुंबरांतील दत्ताचा जनार्दनपंतांचा गुरु म्हणून सांगतांना मजकूर आला आहे तोः
‘‘सोडूनियां मी स्वधर्म। आचरलों नीच कर्म ॥
सेवा केली हीन याती ।.....बालविधवे आलिंगिले । एकासनी बैसविलें । तिशीं रमतां मानिलें। स्वर्गी सुख तृणतुल्य ॥’’,
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP