शेख महंमद चरित्र - भाग १०
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
चवदावा प्रसंगः
‘‘गीता भागवत पुराण । अनेक ग्रंथ शास्त्रें गहन । पदें कथिलीं सद्गुरुनाथानें । अनंत नांवें धरून ॥४०॥
....गीता भागवतीं वनमाळी । वाखाणीं भक्तांचीं ब्रीदावळी । म्हणे भक्त माझी निज रांगोळी । स्वहृदयीं जपतसे ॥६५॥
......गीता भागवत वचनीं । सांगितलें अर्जुना उद्धवालागुनी । पाषाण पुजितां पाषाण होती मेदिनीं । कृष्ण म्हणे कर्मफळ ॥८२॥
.....निबंध साक्ष वचनें । .....॥८३॥...ते सत्य श्रीमुखाची टीका ।.....॥८५॥
....हृदयीं व्हावें सावधान । गोदानीर न्यायें ॥१२८॥
गोदानीर ताविल्या तापतें । निवविल्या निवतें नासतें । तैशी नव्हेत ही साधुमतें । अनादि सिद्ध शुचित ॥१२९॥
....... शेख सैय्यद महंमद महंमदीं ।...॥१३१॥’
’---१३१ ओंव्या.
पंधरावा प्रसंगः
‘‘ॐ नमोजी श्रीसद्गुरु चांद बोधले । त्यांनीं जानोपंता अंगिकारिलें । जानेबानें एका उपदशिलें । दास्यत्वगुणें ॥१॥
.....सत् चांद बोधल्याचें कुळीं शेख । महमंमदांनीं चर्चिला विवेक । ते विवंचनेला संत प्रश्र्निक । आशिर्वाद देती ॥४॥
पादशाहानें मना केली बगणी (वांगणी ?) । चांद बोधले अजमतेचे धणी । त्यांणी त्याची मना कली हागणी । हे विश्र्व साक्ष असे ॥५॥
नृपति लागले बोधल्याचे चरणीं । मग त्यांनीं मोकळी केली हागणी । मग आनंद जाला क्षेत्र भुवनीं । दरुशनें पुजिलीं ॥६॥
हें सांगावया काय कारण । म्हणती शेख महंमदालागून । कोठील पुसा कोणाचा कोण । यालागीं प्रगटिलें ॥७॥
......पापें.... । काशीवास तुळापूर केलया अपार । फिटेत ना वज्रलेपें ॥५४॥
......ऐका मनुष्यहत्येचें पातक । न फिटे तुळापूर केल्या अभिषेक ।.......॥८०॥’’
सोळावा प्रसंगः
‘‘मुसलमानांत होऊनिया पिरु । मराठियांत म्हणवी सद्गुरु । तोचि तारील हा भवसागरु । येर बुडोन बुडविती ॥५७॥
....एक म्हणती हा यातीचा मलवंश (म्लेंच्छ) । भ्हणवून निखंदितों आमच्या देवतांस । याचा मानूं ना आम्ही विश्र्वास । प्रतिमा निखंदिल्या ॥६२॥
देखत अविंध देवळें मोडिती । हा तो त्यांचाच स्वयाती । येणें प्रतिमेची केली माती । आतां काय पुजावें ॥६३॥
यवन देवतांस करिती मार । हे तंव चालिलें असे पारंपार । आम्ही वंदूं ना याचें उत्तर । हा त्यांचाच गोत्या ॥६४॥
ऐका प्रतिउत्तर दीधलें । म्लेंच्छ याति ईश्र्वरें केलें । परी ज्ञान कोणासारिखें नाहीं जाले । शेख महंमद म्हणे ॥६५॥
अविंध यातीस निपजलों । कुराण पुराण बोलों लागलों । सिद्धसाधकांस मानलों । स्वहित स्वहितागुणें ॥६६॥’’
---११४ ओंव्या.
सतरावा प्रसंगः
‘‘सच्चा पीर कहे मुसलमान । मराठे म्हणती सद्गुरु पूर्ण । परी दोन्हींत नाहीं भिन्नत्वपण । आंखी खोल देखो भाई ॥३॥
.....शेख महंमदें उत्तर दिधलें प्रीति । मी नेणें कुशलता व्युत्पत्ती । संस्कारी पंडित हांसती । शुद्ध भाषा नेणें मी ॥४९॥
मी यातीचा मलवंश [म्लेंच्छ] । संस्कार नेणें मर्हाठीस । बोल ठेविती कवित्वास । कुशल ज्ञानी ॥५०॥
महाराष्ट्रभाषा बोलणें बोली । सांगेन अंतरीचीं सखोली । विवंचना करून वेगळाली । श्रोतीं गुह्य घ्यावें ॥७६॥’’
---२४० ओंव्या.
अठरावा प्रसंगः
‘‘......साधे तुळापूर तीर्थ व्रत ।.....॥८२॥
सैय्यद ब्राह्मण उत्तम वंशी । कार्य नाहीं याति नांवासी ।....॥१५१॥
सैय्यद ब्राह्मण उत्तम याति । भ्रष्ट अनाचारें वर्तती ।....॥१५२॥ शेख महंमद मुसलमान ।
---१०६ ओंव्या.
बोलिले हरि जोडे ऐसी खूण ।....॥२१३॥
....यवन म्हणती अनाधजाल काफर । मर्हाटे म्हणती कलंकी अवतार । तो करील अवघा एकाकार । ईश्र्वर म्हणतील आपणास ॥२६९॥
....मीरां महंमदी मुसलमान । ते आल्याची सांगेन खूण ।....॥३०४॥
.....सैय्यद महंमदी सावकाश । सम चिन्हाकार ॥३२७॥’’
---३२८ ओंव्या.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP