शेख महंमद चरित्र - भाग २३
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदाचे चरित्रावर प्रकाश पाडणारीं ऐतिहासिक कागदपत्रें फारशीं सापडत नाहीत. परंतु त्यांचा व त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांचा काव्यसंग्रह बराच उपलब्ध झाला आहे. त्यांत ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे उल्लेख बरेच आले आहेत. ते ऐतिहासिक कागदपत्रांची उणीच बरीचशी भरून काढतात. त्यांच्या कविता व जीं काहीं थोडी कागदपत्रें मिळाली आहेत, त्यांचे साहाय्यानें शेख महंमदांच्या चरित्राची चर्चा करू.
शेख महंमदाचें जें अप्रसिद्ध चरित्र वर आले आहे त्यांत शेख महंमद जयरामस्वामींच्या नंतर अडीच वर्षांनी समाधि घेणार असे सुचविले आहे. हें खरें झाले असले असे मानलें तर जयरामस्वामींचा काल ५ सप्टेंबर १६७२ रोजी झाला असल्याकारणानें शेख महंमद इ. १६७५ त पैगंबरवासी झाले असले पाहिजेत असे समजावे लागेल. परंतु वर जयरामस्वामींचे पत्र म्हणून जो अभंग आला आहे त्यांत ‘‘शेख महंमद पीर’’ असें म्हटलें आहे. यावरून जयरामस्वामींच्या समाधीपूर्वीच शेख महंमद ‘पीरवख्त’ झाले होते असें म्हणावें लागते. त्याचप्रमाणें मुधा पांगुळाच्या लिहिण्याप्रमाणें शेख महंमद इ. स. १६६२ पूर्वीच कबरस्थ झाल्याचें दिसते. ज्याअर्थी शेख महंमदांनीं ‘योगसंग्रामा’ चा समाप्तिकाल इ. स. १६४५ दिला आहे, व अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची मूर्ति लपविली किंवा फोडिली म्हणून जी दंतकथा निर्माण झाली होती तिचा उल्लेख केला आहे, त्याअर्थी शेख महंमद इ. स. १६५९ पर्यंत तरी हृयात होते असें निश्र्चित म्हणतां येते. या पुराव्यावरून आज इतकेच सांगता र्येल की, शेख महंमदाचा समाधिकाल इ. स. १६५० व १६६३ च्या दरम्यानचा आहे.
मालोजी राजे भोसले व त्यांचें दिवाण कान्हेरपंत यांचा एक चकनामा उपलब्ध आहे. तो इ. स. १५९६-९७ तील असून त्यांतील फारसी मजकुरावरून तें दानपत्र १२ जानेवारी १५९२ त झालें होतें असें दिसते. नंतर गावकीच्या संमतीनें शेवटचा चकनामा इ. स. १५९६-९७ त झाला. हा चकनामा अप्रसिद्ध असल्यानें, व त्यावरून मालोजी बारगीर नसून राजे व सरदार होते हे सिद्ध होत असल्यानें त्यास इतिहासक्षेत्रांतहि बरेंच महत्त्व प्राप्त झाले आहे, म्हणून तो समग्रच पुढे देत आहे.
टीपः
पोतदार-संग्रह बाडांक, १ क्र. ५२ संदर्भांक १७५.
पोतदार-संग्रह, बाडांक १, क्र. ७८, व शेख महंमदबाबा मठ संग्रह, बाडांक १, क्र. २८, संदर्भांक ७३ (किरकोळ पाठभेद आहेत).
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP